Advertisement

पावसात घ्या फिश फेस्टिव्हलचा आनंद!

बाहेर मस्त धो धो पडणारा पाऊस आणि अशा वातावरणात झणझणीत पदार्थांचा आस्वाद घ्यायला कुणाला नाही आवडणार? हाच विचार करून मल्टी ट्रेडर्स तर्फे 'फिश फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलं आहे.

पावसात घ्या फिश फेस्टिव्हलचा आनंद!
SHARES

तळलेली सुरमई, पापलेट, बोंबील, प्रॉन्स करी, जवळा, प्लेन राईस, सोडा खिचडी आणि सोबतीला चपाती, भाकरी, सोलकढी, पन्हं... एवढंच नाही तर तोंड गोड करण्यासाठी गुलाबजाम... आहा... नक्कीच हे ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. बाहेर मस्त धो धो पडणारा पाऊस आणि अशा वातावरणात झणझणीत पदार्थांचा आस्वाद घ्यायला कुणाला नाही आवडणार? हाच विचार करून मल्टी ट्रेडर्स तर्फे 'फिश फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलं आहे.



खवय्यांसाठी मेजवानी

मिसळ फेस्टिव्हल, बिर्याणी फेस्टिव्हल, आंबा महोत्सव असे अनेक महोत्सव मुंबईत आयोजित करण्यात आले. या  मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. आता मुंबईत पहिल्यांदाच फिश फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हल अंतर्गत मत्स्य मेजवानी रुचकळ थाळीचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खवय्यांना याचा आस्वाद अनलिमिटेड घेता येणार आहे. मासेमारांकडून थेट ग्राहकांपर्यंत मासळी वाजवी दरात पोहचवण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.



एका थाळीमध्ये तुम्हाला सुरमई, पापलेट, बोंबील, टायगर प्रॉन्स फ्राय, सुरमई करी, प्रॉन्स-जवळा, प्लेन राईस,  प्रॉन्स बिर्याणी, सोडा खिचडी, भाकरी-चपाती आणि गुलाबजाम हे पदार्थ वाढले जाणार आहेत. बापरे! एका थाळीत इतके पदार्थ? हे तर काहीच नाही. भरपेट खाल्ल्यानंतर जेवण पचावण्यासाठी सोलकढी आणि आंबा पन्ह आहेच. हे सर्व अनलिमेटेड आहे. पोटभर तुम्ही या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. जागेची देखील चिंता नको. अंदाजे १ हजार माणसं बसून जेवतील अशी उत्तम सोय आयोजकांनी केली आहे.



कधी आणि कुठे?

९ आणि १० जून असे दोन दिवस खवय्ये या फेस्टिव्हलचा आनंद घेऊ शकता. मुलुंड पूर्वेच्या राजे संभाजी मैदानात या फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. या फेस्टिव्हलचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला अॅडव्हान्समध्ये कुपन्स घ्यावे लागेलबुकिंग करण्यासाठी  ९१५२०१७१४४/४५/४६/४७/४८  या नंबरवर संपर्क कराअधिक माहितीसाठी  www.matsyamejwani.com या वेबसाईटला भेट द्याबुकिंग केलेल्या खवय्यांनाच फेस्टिव्हलमध्ये प्रवेश दिला जाईल.


खालील ठिकाणी मिळतील कुपन्स

  • बिअरबक कॅफेकॅसल मिलठाणे(.)
  • हॉटेल तंदूर चिलीकॅडबरी जंक्शनखोपटठाणे (.)
  • अर्बन युवाझोराष्ट्रीयन बँकेसमोरचरईठाणे (.)
  • मराठा मंडळकेळकर महाविद्यालयासमोरमुलुंड (पू.)
  • टीडीसी कुरिअर कंपनीट्रिनिटी इंटरप्रायजेस,सेक्टर १५नेरुळनवी मुंबई (पू.)



हेही वाचा-

खूब भालो... मुंबईकरांसाठी बंगाली फूड फेस्टिव्हलची मेजवानी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा