Advertisement

खूब भालो... मुंबईकरांसाठी बंगाली फूड फेस्टिव्हलची मेजवानी


खूब भालो... मुंबईकरांसाठी बंगाली फूड फेस्टिव्हलची मेजवानी
SHARES

बंगाली समाजाचा उल्लेख होताच तुमच्या नजरेसमोर चित्र उभं राहतं ते माशांच्या वेगवेगळ्या व्यंजनांचं, कढी-भात, मिष्टी दोई आणि रसगुल्ले. पण प्रत्यक्षात बंगाली खाद्यसंस्कृती ही कितीतरी अंगांनी समृद्ध आहे. रसगुल्ले आणि मासे हे दोन प्रकार सोडले, तर असे अनेक पदार्थ आहेत जे मुंबईकरांना खायला नक्कीच आवडतील. हाच विचार करून मुंबईकरांसाठी पहिल्यांदाच 'बंगाली फूड फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलं आहे.


सौजन्य


फेस्टिव्हलची खासियत

अतिशय समृद्ध अशी बंगाली खाद्यसंस्कृती म्हणजे पाककलेला लाभलेलं एक वरदान आहे. बंगाली खाद्यसंस्कृतीत माशांसोबतच चिकन, मटण आणि शाकाहारी पदार्थांची देखील भली मोठी यादी आहे. व्हेज चॉप, छोलार दाल, भात, भाजा बेगूनी, खिमा गुगनी, शुकतो, आलू फुलकोबी, चिंगरीमलाई करी, धोकर दालना, आलू पोस्तो, चिंगरीमलाई करी, कोशा मंगशो, माशेर मलाई करी, पाबदा माशेर धाल, रुई माशेर कालिया, रोहू फिश मसालामिश्टी पुलाव आणि बरंच काही तुम्हाला या फेस्टिव्हलमध्ये चाखता येणार आहे

याशिवाय चित्रकूट, संदेश, पतिषपता, चीज जलेबी, रसगुल्ला हे बंगाली स्वीट खाता येणार आहेत. या पदार्थांची नावं देखील तुम्ही पहिल्यांदा ऐकली असतील. विचार करा हे सर्व पदार्थ तुम्हाला या फेस्टिव्हलला खाण्याची संधी मिळणार आहे.


सौजन्य

'ग्राम बंगला' म्हणजे ग्रामीण बंगला संस्कृतीवर आधारित हा महोत्सव आयोजित आहे. त्यामुळे अस्सल गावरान बंगाली पदार्थांची चव तुम्हाला चाखता येणार आहे. यासोबतच तुम्हाला जेवण वाढणारे हे पारंपरिक बंगाली वेशात पाहायला मिळतील. खाण्यासोबतच तुम्हाला जुन्या क्लासिकल बंगाली गाणी ऐकण्याचा आनंद घेऊ शकता.


सौजन्य


कुठे आणि कधी?

१७ जूनपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू असणार आहे. मुंबईतल्या हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टलच्या सॉलिटेसर रेस्टॉरंटमध्ये हा फेस्टिव्हल भरला आहेतुम्हाला बंगाली पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर आवर्जून या फेस्टिव्हलला भेट द्या.हेही वाचा-

मुंबईत पहिल्यांदाच रंगणार 'मेरी मॅगी' फेस्टिव्हलसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा