Advertisement

मुंबईत पहिल्यांदाच रंगणार 'मेरी मॅगी' फेस्टिव्हल


मुंबईत पहिल्यांदाच रंगणार 'मेरी मॅगी' फेस्टिव्हल
SHARES

मॅगी हा जवळजवळ सर्वांचा आवडता प्रकार. ५ मिनिटांच्या आत तयार होणारा हा पदार्थ प्रत्येक घरात बनवला जातो. प्रत्येकाच्या मॅगी बनवण्याच्या तऱ्हा देखील वेगळ्या असतात. पण बहुतांश घरात एक तर साधी मॅगी केली जाते, नाहीतर सर्व भाज्या टाकून मॅगी केली जाते. पण तुम्हाला जर ३० वेगवेगळ्या प्रकारची मॅगी चाखायला मिळाली तर? तुम्ही नक्कीच ताव माराल याची खात्री आहे. मुंबईत पहिल्यांदाच 'मेरी मॅगी' फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.



मेरी मॅगी

भूक भागवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे मॅगी. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व या मॅगीचे फॅन आहेत. अशाच या मॅगीचे एक ना दोन तर चक्क ३० प्रकार खाता येणार आहेत. वेगवेगळ्या पदार्थांसोबत मॅगीचं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं ट्राय करायला मिळणार आहे. मसाला मॅगी, अंडा भुर्जी मॅगी, ब्रेड मॅगी, चिकन मॅगी, सालसा मॅगीडीप फ्राइड मॅगी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मॅगी तुम्ही चाखू शकता.



फक्त मॅगी नाही, तर यासोबतच तुम्हाला वाईन आणि बीअर देखील सर्व्ह केली जाईल. त्यामुळे खाण्यासोबतच तुम्हाला ड्रिंक देखील करता येणार आहे. सोबतीला म्युझिकचा आनंद लुटता येणार आहे. 'भुक्कड फ्ले'तर्फे मेरी मॅगी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे नक्कीच या फेस्टिव्हलला चांगला प्रतिसाद मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.

 


कधी आणि कुठे?

मुंबईत दोन दिवस हा फेस्टिव्हल भरणार आहे. १६ आणि १७ जून असे दोन दिवस तुम्ही मेरी मॅगी फेस्टिव्हलचा आनंद घेऊ शकता. जुहूतल्या जेव्हीपीडी स्कीम इथल्या कमला रहेजा हॉलमध्ये सकाळी ११ वाजल्यापासून मेरी मॅगी फेस्टिव्हल रंगणार आहे. यासाठी तुम्हाला तिकीट बुक करावं लागणार आहे. जर अशा हटके फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर तुम्ही इथे क्लिक करा आणि नोंदणी करा. अधिक माहितीसाठी तुम्ही The Bhukkad Flea च्या फेसबुक पेजला देखील भेट देऊ शकता.



हेही वाचा

रमझान स्पेशल : तवा गुरदा, पाया आणि गरमा गरम मालपोवा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा