Advertisement

रमझान स्पेशल : तवा गुरदा, पाया आणि गरमा गरम मालपोवा!

हल्लीच्या धावपळीच्या जगात असे सण लाइफ रिफ्रेश करून जगण्याची नवी उमेद देतात! मग ती दिवाळी असो, ख्रिसमस असो किंवा रमझान ईद असो. प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन कसं करायचं हे ठरलेलं. त्यामुळे मेन्यूही ठरलेलाच असतो. पण तरीही दरवर्षी काही ना काही नाविन्य असतंच.

रमझान स्पेशल : तवा गुरदा, पाया आणि गरमा गरम मालपोवा!
SHARES

रमझान ईद म्हटलं की, डोळ्यांसमोर येते ती मित्र आणि नातेवाइकांची रंगलेली गप्पांची मैफल आणि सैबतीला भरगच्च मेन्यू! आपापल्या कामामध्ये व्यग्र असणारे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक सणाच्या निमित्तानं एकत्र येतात. हीच तर भारतीय सणांची सर्वात मोठी खासियत आहे. हल्लीच्या धावपळीच्या जगात असे सण लाइफ रिफ्रेश करून जगण्याची नवी उमेद देतात! मग ती दिवाळी असो, ख्रिसमस असो किंवा रमझान ईद असो. प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन कसं करायचं हे ठरलेलं. त्यामुळे मेन्यूही ठरलेलाच असतो. पण तरीही दरवर्षी काही ना काही नाविन्य असतंच.



तुम्ही रमझानचा उपवास करत असाल किंवा नसाल, पण या महिन्यात खवय्यांसाठी चांगलीच पर्वणी असते. रमझानच्या दरम्यान अनेक ठिकाणी रात्री बाजार भरतात. इथं तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज अशा पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. मोहम्मद अली रोड खवय्यांसाठी तर जन्नत आहे. या ठिकाणी खादाडांची तुडुंब गर्दी असते. इथं तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही इथं गेलात तर आम्ही जे पदार्थ सांगणार आहोत ते नक्कीच ट्राय करा!


१)  नल्ली निहारी

मांसाहारी पदार्थाच नल्ली निहारी या पक्वान्नाला एका खास पदार्थाचा दर्जा दिला गेला आहे. या डिशमध्ये खास करूनबकऱ्याच्या पुढील पायाच्या नळ्या आणि मांसल भागाचा वापर केला जातोबकऱ्याचं मटणबोटीनळी आणि विविध प्रकारचे मसाले घालून मंद आचेवर शिजवलेल्या या निहारीची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते.



आपण निहारीला मराठीत न्याहारी असं बोलतो. निहारी किंवा न्याहारी या शब्दाची खरी उत्पत्ती अरबी शब्द नहार यापासून झाली आहे. निहारी किंवा न्याहारी हे नाव देण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे, हे पक्वान्न सकाळी न्याहारीला खाल्लं जातं. निहारी या पदार्थाचा उगम मोघल सम्राज्याच्या अस्ताच्या वेळी अठराव्या शतकात जुन्या दिल्लीतील जामा मस्जिद या भागात झाला.


२)  तवा गुरदा

तुम्हाला मांसाहार करायला प्रचंड आवडतं? मग तुम्ही तवा गुरदा हा प्रकार नक्की ट्राय करा. गुरदा म्हणजे कलेजीबकऱ्याच्या कलेजीचे छोटे तुकडे केले जातात.



भारतीय मसाल्यांचा तडका देऊन कलेजी तव्यावर शिजवली जाते. याची चव किती तरी वेळ तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही तवा गुरदाच्या प्रेमातच पडाल.


३)  पाया

मांसाहार म्हटलं की माशाचं कालवण, ओलं-सुकं चिकन, मटण किंवा अगदी तळलेले तुकडे समोर येतात. पण मटणप्रेमींना पाया सूपचंही आकर्षण असतं. बकऱ्याचं मटण आणि त्याचे विविध प्रकार मांसाहारी लोकांसाठी नवे नाहीत.



पण बकऱ्याच्या पायाचा गुडघ्यापासून ते खुरापर्यंतच्या भागाचा तयार होणारा हा पाया अस्सल खवय्यांनाच ठाऊक. गरमागरम पाया रोटी किंवा नानसोबत खाण्याची मजा काही औरच! पाया चवीला तेजतर्रार तर असतोच, याशिवाय स्वस्त आणि शरीरासाठी पौष्टिकही असतो.


४)  हलीम

हलीमचं नाव घेताक्षणी तोंडाला पाणी न सुटणारे खवय्ये दुर्मिळच. बकरीचं मटण, शुद्ध तूप, सुका मेवा आणि गव्हाचा रवा हे त्यातले मुख्य घटक. रमजानच्या मोसमात हंड्रेड पर्सेंट गोट मीट अॅण्ड प्युअर घी अशी गॅरंटी देणारे फलक हलीमच्या प्रत्येक स्टॉलवर झळकतात. उपवास सोडून संध्याकाळच्या नमाजानंतर हजारो जण हलीमचा आस्वाद घेतात.



मटण आणि गव्हापासून, रमझान महिन्यातील हा खास पदार्थ तयार करण्यासाठी कामगार १२ तास काम करतात. शुद्ध तूप, दही, लिंबाचा रस, दूध, कांद्याच्या फोडी, आलं-लसूण मिरची-कोथिंबीर पेस्ट, मीरे आणि वेलची पूड आणि मसाले यांच्या मिश्रणात किमान चार-एक तास मटण मेरीनेट केले जाते. शिजवून मऊ झालेल्या गव्हाच्या रव्याची मिक्सरमधून पेस्ट काढतात. मग दही मसाल्यात रापलेलं मटण धगधगत्या चुलीवर शिजवण्यासाठी चढवतात. मटण मऊ झाले कीत्यात पाणी घातले जातेपुन्हा हे मिश्रण मंदाग्नीवर शिजवत ठेवले जातेशिजवण्यासाठी तब्बल १२ तास लागतात.


५)  मालपोवा

मालपोवा देखील खवय्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो. मैद्यामध्ये साखर घालून त्यात तूप टाकून एकत्र केले जाते. गोडी अधिक वाढावी म्हणून मलई बर्फीदेखील यामध्ये टाकली जाते. त्या नंतर या सर्व मिश्रणात उकडलेली अंडी घालून स्पेशल मालपोवा तयार केला जातो.



अंड्याच्या ऑम्लेटप्रमाणे हा पालपोवा असतो. अंड्याच्या स्वादासोबतच मलई बर्फीची चव याला प्राप्त होते. तुम्हाला बेश्टच मालपोवा खायचा असेल, तर मोहम्मद अली रोड या परिसरातील सुलेमान उसमान मिठाईवाला इथं नक्की भेट द्या.

खस करून वीक-एण्डला मोहम्मद अली रोडला भेट द्या आणि इथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या.



हेही वाचा

ईदचा स्पेशल मेन्यू मिळणारी मुंबईतली ही पाच ठिकाणं!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा