Advertisement

रेग्युलर पिझ्झा खाऊन कंटाळलात? मग हे हटके पिझ्झा ट्राय कराच!

चवीनं वेगळे असणाऱ्या युरोपियन खाद्यसंस्कृतीचा गाभा असलेल्या इटालियन पिझ्झाची क्रेझ मुंबईत वाढत चालली आहे. पण तुम्ही जर एकाच प्रकारचा पिझ्झा खाऊन कंटाळला असाल, तर मग आता वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि पद्धतीचे पिझ्झा तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला सज्ज झाले आहेत!

रेग्युलर पिझ्झा खाऊन कंटाळलात? मग हे हटके पिझ्झा ट्राय कराच!
SHARES

भेळ, पाणीपुरी आणि त्यानंतर आलेल्या चायनीज पदार्थांनी खवय्यांच्या जिभेचे चांगलेच चोचले पुरवले! सामान्यांच्या खिशाला परवडणारे हे पदार्थ आजही सर्वांच्या पसंतीस उतरतात. मात्र, त्याहूनही चवीनं वेगळे असणाऱ्या युरोपियन खाद्यसंस्कृतीचा गाभा असलेल्या इटालियन पिझ्झाची क्रेझ मुंबईत वाढत चालली आहे. पण तुम्ही जर एकाच प्रकारचा पिझ्झा खाऊन कंटाळला असाल, तर मग आता वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि पद्धतीचे पिझ्झा तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला सज्ज झाले आहेत!


बटर चिकन पिझ्झा

बटर चिकन आणि रेग्युलर पिझ्झा यांचं हटके कॉम्बिनेशन म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणीच! या दोघांचा मिलाफ करून एक वेगळीच डिश तुम्ही इथे चाखू शकता. बटर चिकन आणि पिझ्झा अशा दोन वेगवेगळ्या पदार्थांचा मेळ हीच या पिझ्झाची खासियत आहे. त्यात भर म्हणजे चीझ! पिझ्झाच्या प्रत्येक बाईटमध्ये तुम्ही बटर चिकन आणि चीजचा आस्वाद घ्याल. हे तर काहीच नाही. पिझ्झा डिप करण्यासाठी रेग्युलर सॉस नाही, तर तंदुरी सॉस तुम्हाला देण्यात येतो.



किंमत - २६५ पासून पुढे

कुठे - जॉय पिझ्झा

अंधेरी - 6 अँड 7, उपवन बिल्डिंग, इंडियन ऑईल कॉलनीजवळ, डी. एन. नगर, आझाद नगर
मालाड  - शॉप नंबर १, प्लॉट डी, समृद्धी कॉम्प्लेक्स, चिंचोली बंदर रोड


मार्शमॅलो पिझ्झा

मार्शमॅलो पिझ्झा...हे काही तरी नवीन आहे! आपण किती तरी वेळा मार्शमॅलो खाल्ला असेल. पण मार्शमॅलो आणि पिझ्झाचे कॉम्बिनेशन हे भारीच आहे. बेनॅडिक बिस्ट्रो अँड बारनं या पिझ्झाला स्मोरेस हे नाव दिलं. टोस्टेड मार्शमॅलो, सीजनल बेरीज आणि होममेड ग्रॅहम क्रॅकर यापासून हा पिझ्झा बनला आहे. पिझ्झा आणि मार्शमॅलो कॉम्बिनेशनला न्यूयॉर्क सिटीमध्ये ओळख मिळाली. गंमतीची गोष्ट म्हणजे हा पिझ्झा इतका भारी सजवला जातो की, तुम्हाला तो खावासा वाटणार नाही. त्याची डिझाईन खराब झाली तर!



किंमत - ४७०
कुठे - बॅनडिट बिस्ट्रो अँड बार, बिल्डिंग नं. ६८, चॅपेल रोड, लिलावती हॉस्पिटलमागे, वांद्रे


चिकन बेस पिझ्झा

पिझ्झाचा बेस हा मैद्याचा असतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण इथं तसं नाही. इथे पिझ्झाच्या बेससाठी चक्क मैद्याचा वापर केला जात नाही. फुडगॅझम इथं पिझ्झाचा बेस हा चिकनचा असतो! त्यामुळे चिकन प्रेमींसाठी तर हा चिकन बिर्याणीवर चिकन तंदुरीचा योग आहे!



किंमत - दोघांसाठी १०००
कुठे - शॉप नंबर ४, अकलेशवर बिल्डिंग, ओएनजीसी कॉलनी, आयईएस कॉलेज, वांद्रे


कोन पिझ्झा

पिझ्झा आणि कोनमध्ये? तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. कोनी आयलंडमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात हा कोन पिझ्झा खाता येऊ शकतो. 'चिकन श्रीराचा' या कोनमध्ये चिकनचे पीस, अॅलिपिनो, ग्रीन कॅप्सिकम, श्रीराचा सॉस आणि मोझरेला चीझ...आहे की नाही भन्नाट प्रकार!



किंमत - दोघांसाठी ४५०
कुठे - कोनी आयलंड
खार - युनियन पार्क, खार
ब्रीच कँडी - २ए, वॉर्डन रोड, ब्रीच कँडी


व्हीगन रॅम्बो पिझ्झा

आत्तापर्यंत व्हेज आणि नॉनव्हेज पिझ्झा आपण पाहिले. पण या पिझ्झाची बातच काही और आहे! प्राण्यांपासून बनवलेल्या एकाही उत्पादनाचा वापर इथं पिझ्झा बनवण्यासाठी केला जात नाही. फार्मर कॅफेनं पिझ्झा प्रेमींसाठी रॅम्बो पिझ्झा आणला आहे. या पिझ्झाचा बेस हा राजगिरा आणि अमरंथ पिठापासून बनवण्यात आला आहे. बेसवर फ्लेवरसाठी किसलेलं बीट, व्हीगन चीझ आणि काजूचं दूध वापरण्यात येतं. खास करून व्हेज खाणाऱ्यांना हा पिझ्झा नक्कीच आवडेल.



किंमत - ५९० रुपये

कुठे - फार्मर कॅफे, शॉप नंबर २, रीटा अपार्टमेंट, मिनी पंजाब हॉटेलजवळ, वांद्रे



हेही वाचा

मुंबईत येतोय फूड ट्रक फेस्टिव्हल!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा