Advertisement

मुंबईत येतोय फूड ट्रक फेस्टिव्हल!

अस्सल खवय्यांसाठी १७ आणि १८ फेब्रुवारीला 'फूड ट्रक फेस्टिव्हल' आयोजित करण्यात आला आहे. स्ट्रीट फूडसाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास ५൦ फूड ट्रक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातील वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद या फेस्टिव्हलमध्ये घेता येणार आहे!

मुंबईत येतोय फूड ट्रक फेस्टिव्हल!
SHARES

सध्या या स्ट्रीट फूडच्या माहोलमध्ये एक नवा अवतार प्रकट झालाय! तो म्हणजे फूड ट्रक. अर्थात आपल्या ठेलेवाल्यांचं आधुनिक रूप! रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचाच दर्जा आणि ठेलेवाल्यांसारखी किफायती किंमत या दोघांचा मेळ इथं जमतो. अनेकदा आपल्याला काहीतरी चांगलं खायचं असतं. त्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाणं शक्य नसतं. कारण, तेवढा वेळ तर नसतोच आणि शिवाय खिशाला परवडणारे देखील नसते. मग अशा वेळी फूड ट्रक हा उत्तम पर्याय आहे! बर्गर, पिझ्झा, रॅप्स, सँडविच, सलाड, ज्युस यांच्या जोडीला अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजेच घावन, मोदक आणि अगदी मासे, कोलंबी भात यांचा देखील यात समावेश आहे!

परदेशात हे फूड ट्रक सर्रास आढळतात. हळूहळू ही खाद्य संस्कृती मुंबईत देखील रुजत आहे. याच धर्तीवर मुंबईत फूड ट्रक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.


नक्की काय आहे हा फेस्टिव्हल?

अस्सल खवय्यांसाठी १७ आणि १८ फेब्रुवारीला 'फूड ट्रक फेस्टिव्हल' आयोजित करण्यात आला आहे. स्ट्रीट फूडसाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास ५൦ फूड ट्रक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातील वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद तुम्ही या फेस्टिव्हलमध्ये घेऊ शकता!



त्यासोबतच खवय्यांच्या मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रमही इथे आयोजित केले आहेत. गुड फूड + एन्टरटेन्मेंट हॅपी कस्टमर हे त्यांचं ब्रीदवाक्यच आहे!

  • लाइव्ह कॉन्सर्ट
  • बँड परफॉर्मन्स 
  • फॅशन शो
  • स्टँडअप कॉमेडी
  • एक्सपर्ट टॉक
  • गेम्स



कुठे आहे फेस्टिव्हल?

मुलुंडमधल्या लाल बहादूर शास्त्री रोडवरील रिचडसन क्रुडास इथं या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी ९९ रुपये इतकी एन्ट्री फी आहे. तर व्हीआयपी तिकिटांसाठी १ हजार ४९९ रुपये मोजावे लागणार आहेत. तिकीट बुक करण्यासाठी इथे क्लिक करा. अधिक माहितीसाठी त्यांच्या फेसबुक पेजला देखील तुम्ही भेट देऊ शकता.



तुम्ही जर खाण्याचे शौकीन आहात, तर मग या फेस्टिव्हलला नक्की हजेरी लावा. खाणं आणि मनोरंजन एकाच छताखाली अनुभवायला मिळत असेल, तर अजून काय पाहिजे!



हेही वाचा

कॉफीतून प्या तुमचा फोटो! सेल्फिचिनोमध्ये हे शक्य आहे!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा