Advertisement

इथे घ्या फक्त ४९ रुपयांत पिझ्झा आणि डिझर्ट!


इथे घ्या फक्त ४९ रुपयांत पिझ्झा आणि डिझर्ट!
SHARES

हल्ली पोटभर जेवायचं म्हणजे हातात किमान १०० रुपये तरी हवेतच. त्यात पिझ्झा आणि बिर्याणी हा प्रकार असेल तर विचारूच नका. ते १०० रुपये देखील कमी पडतील. पण चारकोल इट्स या कॅफेनं खवय्यांसाठी एक भन्नाट डील आणली आहे!


नक्की काय आहे डील?

स्वादिष्ट आणि उत्कृष्ट अशी बिर्याणी खायची असेल, तर खिशात १५० रुपये तरी असले पाहिजेत. साधा पिझ्झा खायचा असला तरी ५० रुपये पुरत नाहीत. पण मुंबईत असलेल्या चारकोल इट्स कॅफेतर्फे तुम्हाला एक भारी ट्रीट देण्यात आली आहे. फक्त ४९ रुपयांत तुम्हाला एक पूर्ण मिल मिळेल. एका मिलमध्ये एक मेन कोर्स आणि मिल्कशेक किंवा डिझर्टचा समावेश आहे.



व्हेज किंवा नॉनव्हेजमधील एक पदार्थ आणि डिझर्टपैकी एक पदार्थ तुम्ही निवडू शकता. तेही फक्त ४९ रुपयांमध्ये!


व्हेज

  • अफगानी व्हेज बिर्याणी
  • व्हेजिटेबल मसाला बिर्याणी
  • पेरी पेरी व्हेज पिझ्झा स्क्वेअर
  • पनीर टिक्का रोल


नॉनव्हेज

  • अफगाणी चिकन टिक्का बिर्याणी
  • चिकन टिक्का बिर्याणी
  • पेरी पेरी चिकन पिझ्झा स्क्वेअर
  • चिकन टिक्का रोल


डिझर्ट

  • चॉकलेट मूज
  • स्ट्रॉबेरी सुफले
  • ज्युस किंवा मिल्कशेक


किती दिवस आहे ऑफर?

फक्त ११ मार्चला तुम्ही या ऑफरचा आनंद घेऊ शकता. सकाळी ११.३० ते रात्री ११ या वेळेत तुम्हाला ही ऑफर मिळेल. तुम्हाला जर या ट्रीटचा आनंद घ्यायचा असेल, तर त्यांच्या काही अटी आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. ४९ रुपयात फक्त एकच व्यक्ती खाऊ शकते. तुम्ही जेव्हा ऑर्डर द्याल, तेव्हा नाव, फोन नंबर आणि इमेल आयडी शेअर करणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स असेल तो तुमच्या ४९ रुपयांतच अॅड केलेला असेल.



'चारकोल बिर्याणी' या नावानं हा कॅफे ओळखला जायचा. पण आता चारकोल इट्स असं नवीन नाव कॅफेला देण्यात आलं आहे. दादर, वांद्रे, मालाड आणि अंधेरीत चारकोल इट्सचे आऊटलेट्स आहेत.



हेही वाचा

तुम्हाला चीझ खायला आवडतं? मग या फेस्टिव्हलला भेट द्या!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा