मदर डेअरीचे नवे उत्पादन

 Vidhan Bhavan
मदर डेअरीचे नवे उत्पादन

नरीमन पॉंईंट - दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांत अग्रेसर असलेल्या मदर डेअरीने बुधवारी प्रीमियम - हाय क्रीम मिल्क हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. या दुधामध्ये सर्वात जास्त साय असणार आहे.

मुंबईच्या विविध भागांतील ग्राहकांसाठी या उत्पादनाचं उद्घाटन नरीमन पॉंईंट येथील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये करण्यात आले. नवीनच सादर करण्यात आलेले हे प्रीमियम दूध 500 मिली आणि 1 लिटरच्या पॅकेट उपलब्ध असेल. त्याची किंमत अनुक्रमे 27 रुपये आणि 53 रुपये असेल. मदर डेअरीच्या प्रीमियम दुधात सर्वात जास्त म्हणजेच 7 टक्के फॅट आणि 9 टक्के एसएनएफ आहे.

या उत्पादनाबाबत मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर एस. नागराजन म्हणाले, "मला खात्री आहे की ग्राहकांना हे उत्पादन नक्की आवडेल, कारण ते बाजारपेठांतील गरज लक्षात घेऊनच तयार करण्यात आले आहे".

Loading Comments