Advertisement

खेकडा प्रेमींसाठी खुशखबर, 'मिनिस्ट्री ऑफ क्रॅब' लवकरच मुंबईत


खेकडा प्रेमींसाठी खुशखबर, 'मिनिस्ट्री ऑफ क्रॅब' लवकरच मुंबईत
SHARES

खेकडा हे अनेकांच्या आवडीचे खाद्य. नाव घेताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. खेकडा तंदुरी, खेकडा करी आणि खेकडा फ्राय असे खेकड्याचे वेगवेगळे पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर आले असतील. तुम्ही या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद देखील घेतला असेल. पण तुम्ही भारताबाहेर बनलेल्या खेकड्याची चव चाखलीत का? नसेल चाखली तर लवकरच तुम्हाला ही संधी मिळणार आहे. नाही नाही... यासाठी तुम्हाला कुठे परदेशात जावं लागणार नाही. तुम्हाला मुंबईतच खेकड्यांच्या वेगवेगळ्या डिश चाखता येणार आहेत.



श्रीलंकेत प्रसिद्ध असे 'मिनिस्ट्री ऑफ क्रॅब' मुंबईत सुरू होणार आहे. लोअर परेल इथं 'मिनिस्ट्री ऑफ क्रॅब' सुरू होण्याची शक्यता आहे. चिली क्रॅब, गार्लिक क्रॅब, करी क्रॅब, बेक क्रॅब अशा क्रॅबच्या वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.



मुंबईमध्ये 'मिनिस्ट्री ऑफ क्रॅब' सुरू करण्यासाठी महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि शेफ धरन मुनिदास यांनी पुढाकार घेतला आहे.



'मिनिस्ट्री ऑफ क्रॅब' आणि गुरमे इनव्हेस्टमेंट्स एकत्र येऊन मुंबईत ही हॉटेल चेन सुरू करणार आहेत. एशियातल्या ५० चांगल्या रेस्टॉरंटमध्ये 'मिनिस्ट्री ऑफ क्रॅब'चा समावेश आहे. त्यामुळे स्वादिष्ट असे खेकड्यापासून बनलेल्या डिशेस खाण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.  



हेही वाचा

परदेशवारी करणारे वाशीचे खेकडे!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा