Advertisement

तंदुर चायनंतर आता तंदुर मॅगीची क्रेझ

तुम्ही कधी तंदुर मॅगीबद्दल ऐकलं आहे का? हो तंदुर मॅगी. आपण सर्वच मॅगी हा प्रकार आवडिनं खातो. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत 'तंदुर मॅगी'बद्दल

तंदुर चायनंतर आता तंदुर मॅगीची क्रेझ
SHARES

तंदुर चाय, तंदुर मिसळ-पाव, तंदुर चिकन आता हे काही आपल्यासाठी नवीन नाहीत. यातील एक तरी प्रकार प्रत्येकानं कधी ना कधी ट्राय केलाच असेल. पण तुम्ही कधी तंदुर मॅगीबद्दल ऐकलं आहे का? हो तंदुर मॅगी. आपण सर्वच मॅगी हा प्रकार आवडीनं खातो. पण 'मिटींग ऑफ कंटींग'नं पहिल्यांदाच तंदुर मॅगी हा प्रकार खास खवय्यांसाठी सादर केला आहे.


कुणाची संकल्पना?

दिपक या तरूणानं चेंबुरमध्ये 'मिटींग ऑन कंटींग' या नावानं कॅफे सुरू केला. मुंबईकरांना तंदुर फ्लेवर्सची खरी ओळख करून देण्यासाठी दिपकनं हा कॅफे सुरू केला. तंदुर चाय व्यतिरिक्त इतर पदार्थांना पण तंदुरी तडका देता येतो, असं दिपक मानतो. त्यामुळे त्यानं तंदुर मॅगी हा भन्नाट प्रकाराची ओळख खवय्यांना करून दिली.


तंदुर मॅगी ते कॉफी

नेहमीप्रमाणे तंदुर मॅगी बनवून घेतली जाते. त्यानंतर त्याला तंदुरचा तडका दिला जातो. अशा प्रकारे तंदुर मॅगी तुम्हाला सर्व्ह केली जाते. यात चीज देखील असते. सकाळी ७ ते रात्री २ वाजेपर्यंत तुम्ही इथल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. फक्त तंदुर चहा आणि तंदुर मॅगी इथं मिळत नाही तर तंदुर कॉफीसुद्धा इथली आणखी एक खासियत आहे.

कुठे : मिटींग ऑन कटींग, शॉप नंबर ५७. १ नंबर इमारतीच्या मागे, सुभाष नगर, चेंबूर (पू.)



हेही वाचा

एव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉरचे चाहते आहात? मग मार्व्हल्सच्या या कॅफेला भेट द्या


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा