Advertisement

खेकडा तंदुरी, भरलेले मासे आणि बरंच काही, आलाय 'वर्सोवा सी फूड फेस्टिव्हल २०२०'

'सी फूड फेस्टिव्हल' कायमच मुंबईकरांना भुरळ घालतो. असंच एक 'सी फूड फेस्टिव्हल' अंधेरीत भरणार आहे.

खेकडा तंदुरी, भरलेले मासे आणि बरंच काही, आलाय 'वर्सोवा सी फूड फेस्टिव्हल २०२०'
SHARES

मासे, खेकडे, कोळंबी, सुकट आणि त्यासोबत भाकरी... आहाहा... सुटलं की नाही तोंडाला पाणी?गरमा-गरम तांदळाची भाकरी आणि सर्व प्रकारच्या माशांचे आणि खेकड्याचे कालवण, तंदूर, तळलेले पॉपलेट, बांगडा असे सर्व प्रकारचे मासे थंडीत खाण्याची मजा काही औरच. या सर्व पदार्थांवर ताव मारण्याची संधी खवय्यांना फक्त 'सी फूड फेस्टिव्हल'मध्ये मिळू शकते. 'सी फूड फेस्टिव्हल' कायमच मुंबईकरांना भुरळ घालतो. असंच एक 'सी फूड फेस्टिव्हल' अंधेरीत भरणार आहे. त्यामुळे खवय्यांसाठी तर ही पर्वणीच आहे.


विकेंडला खादाडी

विकेंडला म्हणजेच १७, १८ आणि १९ जानेवारीला सी फूड फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. अंधेरीतल्या गणेश मंदिराजवळील वर्सोवा व्हिलेजमध्ये तीन दिवस संध्याकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत हा फेस्टिव्हल रंगणार आहे. कोळी समाजातर्फे या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.


सी फूड फेस्टिव्हलची खासियत

फेस्टिव्हलमध्ये खास कोळी मसाल्यांमध्ये बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल असती. सी फूडचा आस्वाद घेता घेता दुसरीकडे कोळी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमही अनुभवता येणार आहेत. कोळी महिलांच्या खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळावी आणि कोळी संस्कृतीचं दर्शन घडावं म्हणून दरवर्षी सी फूड फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. दरवर्षी लाखो मुंबईकर या फेस्टिव्हलला हजेरी लावता.

तुम्हाला मासे, खेकडे आणि इतर झणझणीत पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे? मग नक्की या फेस्टिव्हलला भेट द्या आणि लज्जतदार अशा सी फूड पदार्थांचा आस्वाद घ्या.

स्थळ – वर्सोवा व्हिलेज, गणेश मंदिराजवळ, चर्च रोड, अंधेरी(.)

कधी- १७, १८ आणि १९ जानेवारी २०२०

वेळ – संध्याकाळी ६ ते रात्री १२


हेही वाचा

दशकपूर्ती : गेल्या १० वर्षात या '८' रेस्टो आणि कॅफेंनी बदलली खाद्यसंस्कृती

मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा