Advertisement

गरजूंसाठी एक लाख जम्बोकिंगचं वाटप

जम्बोकिंगकडून देखील गरजूंना पदार्थांचं मोफत वाटप करण्यात येत आहे. तुम्ही देखील त्यांच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊ शकता.

गरजूंसाठी एक लाख जम्बोकिंगचं वाटप
SHARES

चोवीस तास जागे असणारे शहर अशी मुंबई शहराची ओळख आहे. एकीकडे अनेक प्रोफेशनल्सना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे. तरी ज्या कामांसाठी प्रत्यक्ष उपस्थित असण्याची गरज आहे, अशा मजुरांना आणि कामगारांना घरून काम करणं शक्य नाही. पण कोरोनामुळे आज त्यांना घरात बसावं लागत आहे. कित्येक कामगारांना तर राहण्यासाठी घर नसल्यानं रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. अशा गरजूंसाठी पालिकेसोबतच अनेक संस्था देखील पुढे सरसावल्या आहेत.

जम्बोकिंगकडून देखील गरजूंना पदार्थांचं मोफत वाटप करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी एशिअन हार्ट इन्स्टिट्यूट आणि केट्टो (हा एक भारतीय क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म असून या माध्यमातून व्यक्ती आणि एनजीओंना सामाजिक कार्यसासाठी निधी उभारता येतो) यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्या सहयोगानं #JoyofGivingwithJumboking कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. ज्यांना शहरातील गरजूंच्या खाण्यापिण्याची सोय करायची आहे ते १२ रुपये देऊन अन्नदान करू शकतात.

तुम्ही केट्टो #JoyofGivingwithJumboking आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट अभियानावर रु.१२० रुपयांची देणगी दिली तर जम्बोकिंग तुमच्यातर्फे १० लोकांचे पोट भरू शकेल. तुम्ही दान केलेले बर्गर्स रॉबिनहूड आर्मी घेईल आणि शहरातील गरीब वस्त्यांमध्ये त्याचे वाटप करण्यात येईल. रॉबिनहूड आर्मी ही सेवाभावी कार्यकर्त्यांचे एनजीओ नेटवर्क आहे. या नेटवर्कतर्फे कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी स्वच्छतेचे नियम पाळण्यात येतात.

जम्बोकिंग फुड्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक धीरज गुप्ता म्हणतात, “प्रत्येकालाच आपला खारीचा वाटा उचलायचा आहे. पण तो कसा उचलावा हे कदाचित त्यांना माहीत नसते. छोट्यात छोटे योगदानसुद्धा महत्त्वाचे आहे! आमच्या पदार्थ वाटप अभियानाच्या माध्यमातून हातावर पोट असलेले कामगार, घरकाम करणारे नोकर, बांधकाम कामगार, मजूर, रिक्षा ओढणारे, फुगेविक्रेते इत्यांदींपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कोव्हिड १९ लॉकडाऊनमुळे पुढील किमान काही आठवडे यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उत्पन्नाची साधनेच उपलब्ध नसतील.”

फिलान्थ्रॉपिस्ट आणि विचारवंत डॉ. रमाकांत पांडा म्हणतात की, “अशा बिकट परिस्थितीत, आपल्यापैकी प्रत्येकानं अजून एका व्यक्तीचं पोट भरण्याची जबाबदारी घेतली तर आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकू.”

मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट नेहमीच धर्मादाय प्रयत्नांमध्ये आघाडीवर असते. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटनं जम्बोकिंग या स्थानिक क्यूएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स) साखळीशी हातमिळवणी करून #JoyOfGivingWithJumboking या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून छोटीशी रक्कम देऊन तुम्हाला या शहराचे पोट भरण्याच्या अभियानात सहभागी होण्यास मदत करणे, हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा