मुलजीभाई मेहता स्कूल फुटबाॅल स्पर्धेत सर्वोत्तम


  • मुलजीभाई मेहता स्कूल फुटबाॅल स्पर्धेत सर्वोत्तम
SHARE

तेरेसरीयन चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने संत मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ विरार येथे अायोजित करण्यात अालेल्या फुटबाॅल स्पर्धेत विरारच्या मुलजीभाई मेहता स्कूलने मीरा रोडच्या सेंट झेवियर हायस्कूलचा १-० असा पाडाव करत मुलींच्या १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. पिधिमा नायर हिने लगावलेला गोल विजेतेपदासाठी मोलाचा ठरला.मुलांमध्ये होली क्राॅसची बाजी

मुलांच्या १४ वर्षांखालील गटात विरारच्या होली क्राॅस शाळेने नालासोपारा येथील तेरेसरियन अकादमीचा ४-० असा पाडाव करून विजेतेपदाला गवसणी घातली. होली क्राॅसकडून क्लाइव्ह गोन्सालविसने दोन गोल करून विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला जेमिसन पॅरिस यानेही दोन गोल करून चांगली साथ दिली. विजेत्या संघांना बिपीन फुटबाॅल अकादमीचे संस्थापक-अध्यक्ष सुरेंद्र करकेरा यांच्या हस्ते गौरविण्यात अाले.


हेही वाचा -

अजित अागरकरची निवड समितीतून हकालपट्टी?

मुंबईची निवड समिती खेळाडूंच्या करिअरशी खेळतेय – दिलीप वेंगसरकर

कसोटीतही अोपनिंगला येण्यास रोहित शर्मा सज्जसंबंधित विषय
ताज्या बातम्या