Advertisement

महापालिका विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षण


महापालिका विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षण
SHARES

मुंबई - जस्ट प्ले च्या माध्यमातून मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फीफाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी मिशन एलेव्हन हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका, फीफा,ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, डब्लू आय एफ ए , एम डी एफ ए या सर्व संस्था एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी फूटबॉल प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. भारतात २०१७ च्या U17 फुटबॉल वर्ल्डकपच्या तयारीसाठी मिशन XI मिलियनचा शुभारंभ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईनंतर ठाणे किंवा महाराष्ट्रातील इतर शाळांमधील विद्यार्थांना देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी शाळेतील पिटी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमात मुंबईत भाजपाचा महापौर कसा बसवता येईल या दृष्टीने भाजपच्या कार्यकर्त्यांना काम करायला सांगितले आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी बाकी खेळ आम्हास माहिती नाहीत, पण आमचे लक्ष्य फक्त गोलकडे आहे, असं सांगत शेलारांवर निशाणा साधला आहे. मुंबईत शिवसेनेचाच महापौर असेल या दृष्टीने शिवसेना तयारी करत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा