विफा यूथ लीगमध्ये प्रिन्स सिंगचे ४ गोल


SHARE

प्रिन्स सिंग याच्या शानदार कामगिरीमुळे नागपूरच्या डीडीएसवाय संघाने सोलापूरच्या स्टार एफसी संघाविरुद्ध ७-० अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला. चर्चगेट येथील कूपरेज मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या विफा यूथ लीग (१४ वर्षांखालील) चॅम्पियनशिपमध्ये प्रिन्स सिंगने चार गोल लगावत डीडीएसवायच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.


सुरुवातीलाच हॅटट्रिकची नोंद

नागपूरच्या बलाढ्य संघाने सुरुवातीपासूनच अाक्रमक खेळावर भर दिला. प्रिन्सने नवव्या अाणि ११व्या मिनिटाला गोल करून डीडीएसवायला शानदार सुरुवात करून दिली. सात मिनिटानंतर त्याने अाणखी एका गोलाची भर घालत सुरुवातीलाच अापली हॅटट्रिक साजरी केली. अर्पण महाजन (२६व्या मिनिटाला), अनिश ठाकरे (३४व्या मिनिटाला) यांनी गोल केल्यामुळे डीडीएसवायने पहिल्या सत्रात ४-० अशी भक्कम अाघाडी घेतली होती. त्यानंतर स्टार एफसीने स्वत:हूनच अापल्यावर गोलची नामुष्की अोढवून घेतली. सामना संपायला सात मिनिटे शिल्लक असताना प्रिन्सने चौथा गोल करत अापल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला.


एफसी पुणे सिटीची अागेकूच

अ गटात, एफसी पुणे सिटी संघाने एमएमएसए संघाचा २-० असा पराभव केला. वियान मुरगोड (१०व्या मिनिटाला) अाणि दिनेश सिंग (३९व्या मिनिटाला) हे पुणे सिटीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अन्य सामन्यांत, नागपूरच्या राहुल एफए संघाने सोलापूरच्या योद्धा एफसी संघाविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करली. मुंबईच्या केंकरे एफसीला पुण्याच्या केएमपी इलेव्हनविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले.


हेही वाचा -

पृथ्वी शाॅची भारतीय कसोटी संघात निवड

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या