SHARE

विलिंग्डन कॅथाॅलिक जिमखान्यातर्फे अापली ३१वी अांतरपॅरिश ५-ए-साइड रिंक फुटबाॅल स्पर्धा सांताक्रूझ येथील जिमखान्याच्या फ्लडलाइट्स टेनिस कोर्टवर सोमवारपासून अायोजित करण्यात अाली अाहे. विक्टर डिमेलो ट्राॅफीसाठी होणाऱ्या या स्पर्धेत गतविजेता सॅक्रेड हार्ट अ संघाचा (अंधेरी) सलामीचा सामना उमरखाडीच्या सेंट जोसेफ संघाविरुद्ध रंगणार अाहे.


९० संघांचा सहभाग

या स्पर्धेला मुंबईतूनच नव्हे तर वसई, वाशी अाणि नवी मुंबईतील संघांचा सहभाग लाभला अाहे. मुंबईच्या दक्षिण, पश्चिम अाणि मध्य मुंबईतून तसेच वसई, वाशी अाणि नवी मुंबईतून तब्बल ९० पॅरिशचे संघ एकमेकांशी झुंजणार अाहेत. पुरुष गटाबरोबरच महिला अाणि सिनियर पुरुषांसाठीही स्पर्धेचं अायोजन करण्यात अालं अाहे. गाॅडफ्रे परेरा अाणि स्टीव्हन डायस यांसारखे भारताचे स्टार फुटबाॅलपटू या स्पर्धेत खेळले अाहेत.


विजेत्यांंवर बक्षिसांचा वर्षाव

पुरुष, महिला अाणि सिनियर पुरुष या तिन्ही गटाची अंतिम लढत ४ नोव्हेंबर रोजी रंगणार अाहे. विजेत्या तसेच उपविजेत्या संघाला अाकर्षक बक्षिसे अाणि गिफ्ट्स देऊन गौरविण्यात येणार अाहे. त्याचबरोबर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या वैयक्तिक खेळाडूंनाही अाकर्षक बक्षिसे देण्यात येतील.


हेही वाचा -

क्रांती साळवीची नऊवारी नेसून मॅरेथाॅनमध्ये धाव, गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद

ब्रेट लीने घेतलं बाप्पाचं दर्शनसंबंधित विषय
ताज्या बातम्या