Advertisement

धक्कादायक, नालासोपारात ऑक्सिजन न मिळाल्याने १० रूग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.

धक्कादायक, नालासोपारात ऑक्सिजन न मिळाल्याने १० रूग्णांचा मृत्यू
SHARES

ऑक्सिजन न मिळाल्याने एक तासात तब्बल १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपारात घडली आहे. नालासोपारातील विनायक रुग्णालय आणि रिद्धीविनायक रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांचा विनायक हॉस्पिटलमध्ये राडा घातला. तर ऑक्सिजनमुळे नाही तर क्रिटिकल परिस्थितीमुळे रुगणांचा मृत्यू झाला असल्याचा हॉस्पिटल प्रशासनाने दावा केला आहे. 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. विनायक रुग्णालय आणि रिद्धीविनायक रुग्णालय या दोन्ही रुग्णालयामध्ये सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ऑक्सिजन साठा संपला. त्यामुळे दोन्ही रुग्णालयामध्ये एका तासात १० रुग्णांचा जीव गेला. या सर्व घटनेमुळे रुग्णालयाबाहेर सोमवारी रात्री मोठा गोंधळ उडाला होता. 

रुग्णांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच मनसे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमा झाले होते. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. हे सर्व रुग्ण अस्वस्थ होते त्यामुळे यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. 

दरम्यान, ठाण्यात रविवारी ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे तब्बल २६ रुग्णांना पार्किंग प्लाझा कोविड सेंटर मधून ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तर काही रुग्णांना उपचारासाठी बेड देखील मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना जमिनीवर बसून उपचार घेण्याची वेळ आली आहे.



हेही वाचा - 

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा

आता १० वी, १२वी च्या परीक्षांसाठीही ‘एसओपी’

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा