Advertisement

भाटिया हॉस्पिटलच्या आणखी १० कर्मचाऱ्यांना कोरोना

ताडदेव येथील भाटिया रुग्णालयातील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भाटिया हॉस्पिटलच्या आणखी १० कर्मचाऱ्यांना कोरोना
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. ताडदेव येथील भाटिया रुग्णालयातील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं आता भाटिया रुग्णालयातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ४५ झाली आहे.

मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित कर्मचारी असलेलं भाटिया रुग्णालय तिसऱ्या क्रमांकाचं आहे. वोकहार्ट आणि जसलोकमधील अनुक्रमे ८० आणि ५७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील आरोग्य यंत्रणेतील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा 300 च्या जवळ पोहोचला आहे. बॉम्बे हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या १९ वर पोहोचली आहे. तर पालिकेच्या चर्चगेट येथील कान, नाक आणि घशाच्या (ईएनटी) दवाखान्यात १३ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. याशिवाय शिवडीच्या टीबी रुग्णालयात एक डॉक्टर आणि वॉर्डबॉयलाही कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे.

 चर्चगेटमधील पालिकेच्या कान, नाक आणि घसा रुग्णालयात आधीपासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यात १३ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले.



हेही वाचा -

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

मुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा