Advertisement

कस्तुरबा रुग्णालयातून आतापर्यंत १०० रुग्ण कोरोनामुक्त

कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. कस्तुरबा रुग्णालयातून 100 वा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

कस्तुरबा रुग्णालयातून आतापर्यंत १०० रुग्ण कोरोनामुक्त
SHARES

कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे.  कस्तुरबा रुग्णालयातून 100 वा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. हा रुग्ण आता घरी परतला आहे. निरोप घेताना या रुग्णाने कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे व्यक्तिश: आभार मानले.

कस्तुरबा रुग्णालयाने कोरोनाच्या लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरूवातील तेव्हापासून आजपर्यंत कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे उपचार करण्यात येत होते. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, कामगार, कर्मचारी दिवस-रात्र एक करून रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत.

रुग्णालयात आतापर्यंत भरती केलेल्या एकूण रुग्णांपैकी १०० रुग्ण बरे झाले आहेत. बरा झालेला 100 रुग्ण मंगळवारी आपल्या घरी परतला. या १०० रुग्णांमध्ये ६० पुरुषांचा आणि ४० महिलांचा समावेश आहे. तसंच यामध्ये ६० वर्षांवरील वय असणाऱ्या २४ ज्येष्ठ नागरिकांचा तर १० वर्षांखालील ७ बालकांचा समावेश आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयांतून आतापर्यंत ४०० जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधून ७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील सर्वाधिक 30 रुग्ण बरे झाले आहेत.  कुर्ला परिसरातील खान बहादूर भाभा रुग्णालयातून २२, तर घाटकोपरमधल्या राजावाडी परिसरातील ‘सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा रुग्णालया’तून १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कांदिवली पश्चिम परिसरातील ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालया’तून ३ रुग्ण, तर वांद्रे पश्चिम परिसरातील खुरशादजी बेहरामजी भाषा रुग्णालयातून २ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.



हेही वाचा -

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

मुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा