Advertisement

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ‘इतक्या’ लोकांना मिळाली पहिल्याच दिवशी लस

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र दिनाला म्हणजेच १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला राज्यात सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ‘इतक्या’ लोकांना मिळाली पहिल्याच दिवशी लस
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र दिनाला म्हणजेच १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला राज्यात सुरुवात करण्यात आली आहे. लशीचा साठा मर्यादीत असला, तरी या टप्प्यातील लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी २६ जिल्ह्यात लसीकरण करण्यात आलं.

राज्यातील २६ जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. त्यानुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं, असं आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आलं आहे.

सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी कोव्हिशील्ड लसीचे ३ लाख डोस खरेदी केले आहेत. त्यानुसार उर्वरित जिल्ह्यांमध्ये २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. मुंबईत देखील ५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे.

हेही वाचा- कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रांवर विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन जनतेला केलं.

आपल्याकडे दिवसाला १३ लाख लोकांचं लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु केंद्राकडून मर्यादीत साठा मिळत आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या सुमारे ६ कोटी इतकी आहे. त्यांच्या लसीकरणासाठी आपल्याला किमान १२ कोटी लसीचे डोस लागतील. कुठल्याही लस उत्पादक कंपनीकडून आपल्याला एवढे डोस उपलब्ध होत असतील. तर आपण एकरकमी पैसे देऊन लसीचा साठा विकत घ्यायला तयार आहोत, असा दावाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. सोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी जास्तीत जास्त लस पुरवण्याची मागणी देखील केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा