Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ११७ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२१ ऑक्टोबर) ११७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १२८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ११७ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२१ ऑक्टोबर) ११७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १२८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ६ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील २, तसेच खांदा कॉलनी, नवीन पनवेल, वळवली आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १८, नवीन पनवेल १३, खांदा काॅलनी ७, कळंबोली ८, कामोठे २७, खारघर ४२, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ९, नवीन पनवेल १५, कळंबोली १५, कामोठे ३७, खारघर ५० तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २२६४३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २१०५८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५२७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०५८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन

बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानंसंबंधित विषय
Advertisement