Advertisement

भारतात ११,७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. देशात ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे.

भारतात ११,७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण
SHARES

देशात कोरोनाचे संकट असतानाच ‘म्युकोरमायकोसिस’ या आजारानेही थैमान घातलं आहे. देशात आतापर्यंत  १ हजार ७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे समोर आले आहे. ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण गुजरात आणि महाराष्ट्रात आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. देशात ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे. अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला साथीचा आजार घोषित केले आहे. 

 केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ट्वीट करत ही आकडेवारी दिली आहे. गुजरातमध्ये २८५९, महाराष्ट्रात २७७० आणि आंध्र प्रदेशमध्ये ७६८ ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे.  कर्नाटकमध्ये ४८१, हरियाणात ४३६, तामिळनाडूत २३५, बिहारमध्ये २१५, पंजाबमध्ये १४१, उत्तराखंडमध्ये १२४ आणि छत्तीसगडमध्ये १०३ रुग्ण आहेत. तर चंदीगडमध्ये ८३, गोव्यात १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

या व्यतिरिक्त अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ब्लॅक फंगसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, आसाम, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किममध्ये एकही रुग्ण नाही. .हेही वाचा -

हार्डवेअर, छत्र्या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय

MPSC पोलीस उपनिरीक्षक भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा