Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ११९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ( २५ नोव्हेंबर) ११९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ११९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ( २५ नोव्हेंबर) ११९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच नवीन पनवेल येथील एका मृत्यूची नोंद झाली आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १०, नवीन पनवेल १९,  खांदा काॅलनी २, कळंबोली ८, कामोठे ७, खारघर ४९, तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ६, नवीन पनवेल १२, कळंबोली ९, कामोठे १६, खारघर २३, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २५०८८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३९१६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५९६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 

दिवाळीच्या काळात जमाव जमविणे, मुखपट्टी न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीला हरताळ फासल्याने हे संकट ओढवले आहे. तसेच नागरिकांनी दिवाळीत पालिकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने  कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचे प्रशासनाचे मत आहे.

सिडकोकडे पनवेल पालिकेने दोनशे खाटांच्या कोविड रुग्णालयाची मागणी केली होती. सिडकोने करोनाची संख्या उतरत्या काळात रुग्णालय देण्याची मागणी मान्य केली. मात्र दोनशे खाटांपैकी पनवेल पालिकेला अवघे पन्नास खाटाच उपलब्ध होणार आहेत. 

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पनवेलसाठी तीन महिन्यांपूर्वी ५३ कृत्रिम श्वसन यंत्रणा खाटांची उपलब्धता केली होती. त्यापैकी दहा खाटा पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात तर ३३ खाटा कामोठे येथील एमजीएम व नेरुळ येथील डी वाय पाटील रुग्णालयांना दिल्या आहेत.



हेही वाचा -

आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण

रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही - एफडीए



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा