Advertisement

५ वर्षांच्या 'ती'लाही बनायचयं 'तो'

ललितच्या प्रकरणापासून लिंगबदलाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. त्यामुळेच ललितपाठोपाठ अन्यही मुली देखील लिंग परिवर्तनासाठी पुढं येत आहेत. ललितनंतर लिंगबदलासाठी वाढलेला हा कल लक्षात घेता सेंट जाॅर्ज रूग्णालयात त्यासाठी स्वतंत्र बाह्य रूग्ण विभागही सुरू करण्यात आला आहे.

५ वर्षांच्या 'ती'लाही बनायचयं 'तो'
SHARES

बीड पोलिस दलातील काॅन्स्टेबल ललित साळवेवर मुंबईतील सेंट जाॅर्ज रूग्णालयात यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रिया झाल्यापासून सेंट जाॅर्ज रूग्णालयाकडे लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे. आतापर्यंत १२ जणांनी या शस्त्रक्रियेसाठी विचारणा केल्याची माहिती रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. मधुकर गायकवाड यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. विशेष म्हणजे या १२ जणांमध्ये एका ५ वर्षांच्या लहान मुलीचा समावेश आहे. मराठवाड्यातील ५ वर्षाच्या 'ती' ला 'तो' व्हायचं असून तिच्या आई-वडिलांनी नुकताच रूग्णालयाशी संपर्क केला आहे. पुढील प्रक्रियेसाठी ही मुलगी पालकांसोबत रूग्णालयात दाखल होणार असल्याचंही डाॅ. गायकवाड यांनी सांगितलं.


ललितचा खडतर प्रवास यशस्वी

२०१० पासून पोलिस दलात काॅन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेला ललित लहानपणापासूनच स्वत:च्या ओळखीसाठी संघर्ष करत होता. या संघर्षाला वाट करून देत लिलतनं न्यायालयीन लढा दिला. हा लढा यशस्वी झाल्यानंतर त्याचा 'ती'पासून सुरू झालेला प्रवास अखेर 'तो'पर्यंत पोहोचला आहे.




विचारप्रक्रियेत बदल

लिंगबदल शस्त्रक्रियेबद्दल समाजात म्हणावी तशी जागरूकता नसल्याने लिंगबदल करण्यास इच्छुक असणाऱ्यांना समाजाची हेटाळणी आणि कुचेष्टेला सामोरं जावं लागतं. पण ललितच्या प्रकरणापासून लिंगबदलाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. त्यामुळेच ललितपाठोपाठ अन्यही मुली देखील लिंग परिवर्तनासाठी पुढं येत आहेत. ललितनंतर लिंगबदलासाठी वाढलेला हा कल लक्षात घेता सेंट जाॅर्ज रूग्णालयात त्यासाठी स्वतंत्र बाह्य रूग्ण विभागही सुरू करण्यात आला आहे.




आसाममधून विचारणा

आतापर्यंत १२ जणांकडून लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी विचारणा करण्यात आली असून यातील बहुतांश मुलीच असून त्यांना मुलगा व्हायचं असल्याचंही डाॅ. गायकवाड यांनी सांगितलं. आसाममधील रिता देवी या ३७ वर्षीय महिलेला पुरूष व्हायचं असून ही महिला याआधी आसाममधील एका रूग्णालयात उपचार घेत होती. पण सेंट जाॅर्ज रूग्णालयाबद्दल माहीत झाल्यानंतर तिनं थेट रूग्णालयाशी संपर्क साधला. त्यानुसार बुधवारी, २५ जुलैला रिता मुंबईत दाखल होणार असल्याचंही डाॅ. गायकवाड यांनी सांगितलं. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी आधी काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्या करून घेण्यासाठी रिता बुधवारी मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळं लवकरच ललितप्रमाणं रितालाही नवी ओळख मिळणार आहे.




बीडमधलं दुसरं प्रकरण

एकीकडं ललित, रिता आणि दुसरीकडं एक ५ वर्षाची चिमुरडी. बीडमधील माजलगावमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला आपली मुलगी मुलगी नसून ती मुलगा असल्याचं भासू लागलं. त्यानुसार मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा संशय खरा ठरला. त्यातच ललितबद्दल एेकलेल्या मुलीच्या पालकांनी थेट ललितशी संपर्क साधला नि आता हे कुटुंब सेंट जाॅर्जपर्यंत पोहोचलं आहे.

या ५ वर्षांच्या मुलीच्या आई-वडिलांनी आपल्याशी संपर्क साधला असून त्यांना आवश्यक ती मदत केल्याची माहिती ललित साळवेनं 'मुंबई लाइव्ह'ला दिली. तर या चिमुरडीही लवकरच मुंबईत दाखल होण्याची आणि तिच्याही वैद्यकिय चाचणी होण्याची शक्यता आहे.


कायदेशीर बाबी तपासणार

या मुलीच वय केवळ ५ वर्षच असल्यानं कायदेशीर बाबींही कुटुंबियांसह रूग्णालयाला तपासून घ्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करतच ५ वर्षांच्या चिमुरडीच्या लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही डाॅ. गायकवाड यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

आता खरा प्रवास सुरु- ललितकुमार साळवे

ललिताला दर्जा पुरूषाचा की स्त्रीचा?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा