Advertisement

आता खरा प्रवास सुरु- ललितकुमार साळवे

लिंग परिवर्तनासारख्या किचकट शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी ललितला आरोग्याची काळजी घ्यायला सांगितलं अाहे. पण फक्त एक आठवडा आराम करून ललित रुजू झाला.

आता खरा प्रवास सुरु- ललितकुमार साळवे
SHARES

बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे यांची लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. अाता ललिता ललित बनला अाहे. लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियेनंतर मंगळवारी ललित बीड जिल्ह्यातील माजलगाव पोलीस स्टेशनवर "ऑन ड्युटी" आला अाहे. ललितचा खडतर प्रवास

बीड जिल्यात मध्यमवर्गीय परिवारात वाढलेल्या ललिता म्हणजेच ललितकुमार हा मुळातच स्त्री नसून पुरुषच आहे, हे ललितच्या मामांना कळलं होतं. पण याबाबत त्यांनी गुप्तता पाळली होती. वयात येताना ललिताला हार्मोनल बदलांमुळे आपण स्त्री नसून पुरुष आहे असं वाटू लागलं.
त्याप्रमाणे वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यानंतर ललितला याची खात्री पटली. पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल ललिताने लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. अनेक अडचणींनंतर २५ मे २०१८ रोजी अखेर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. १२ जून २०१८ रोजी ललिताची लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली. 


डॉ. कपूर यांनी केली शस्त्रक्रिया

मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर यांच्या अध्यक्षतेखाली या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात युरीनेशनसाठी ट्यूब बसवण्यात आली आहे. शस्त्रक्रियेचा दुसरा टप्पा हा पुढील ३ ते ६ महिन्यात होणार असून येत्या पंधरा दिवसात पुन्हा तपासणीसाठी ललित मुंबईत येणार आहे, अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली.


 एका आठवड्यानंतर ऑन ड्युटी

लिंग परिवर्तनासारख्या किचकट शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी ललितला आरोग्याची काळजी घ्यायला सांगितलं अाहे.  पण फक्त आठवडा आराम करून ललित रुजू झाला. आतापर्यंत महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेली ललिता साळवे आता पुरुष शिपाई म्हणून रुजू झाली. खडतर प्रवासानंतर आज समाधानी होऊन काम करायला एक वेगळा आनंद मिळतोय, असं ललितने सांगितलं.  ललितकुमार साळवेला महाराष्ट्र पोलिस दलातर्फे नवा गणवेश आणि नवी नेमप्लेट देण्यात आली अाहे.हेही वाचा -

कुरिअर बाॅय बनून वृद्धेची हत्या करणारा अटकेत

विवाहितेत त्रास देणारा अटकेत
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement