लहानपणी ट्युमर समजून काढून टाकलं लिंग, ललिता ही मूळ पुरूषच!


SHARE

ललिता साळवे या महिला पोलिस कॉन्स्टेबलने मागितलेली लिंग परिवर्तनाची परवानगी आणि त्यानंतर झालेली न्यायालयीन लढाई यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस दलासोबतच सगळीकडेच या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आता या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. ललिता ही आधीपासूनच पुरूष होती अशी माहिती आता समोर आली आहे.


लिंगबदलासाठी ललिताचा लढा

बीड जिल्ह्यामध्ये महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून ललिता कार्यरत आहे. आपल्यामधल्या पुरुषी भावना आणि बदलांमुळे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरून ललिताने लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिस दलाकडून यासाठी आडकाठी केली जात होती. अखेर न्यायालयाने ललिताला ती परवानगी दिली. ललिता साळवेच्या लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. २५ मे २०१८ रोजी सकाळी साडेआठ वाजता ही शस्त्रक्रिया झाली.


ट्युमर समजून काढून टाकलं होतं लिंग

वयाच्या सातव्या वर्षीच ललिताला आपल्या योनी मार्गावर एक गाठ जाणवली. पण ती गाठ नसून अविकसित अवस्थेतील पुरुषी लिंग होतं हे तिला समजलं नाही. आपल्याला होत असलेला त्रास तिने तिच्या आई-वडिलांना सांगितला असता त्यांनी थेट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. विशेष म्हणजे डॉक्टरांनीही तो 'ट्युमर' आहे, असं समजून तो भाग काढून टाकला.


वयाच्या विसाव्या वर्षी पोलिस दलात भरती

ललिता मध्यमवर्गीय घरामध्ये लहानाची मोठी झाली. ती पोलिस दलात भरती होणार हे तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण वयाच्या विसाव्या वर्षी ललिता बीड जिल्ह्यात महिला कॉन्स्टेबल म्हणून कामावर रुजू झाली.


ललिताची द्विधा अवस्था

तरुण वयात येत असताना ललितामध्ये शारिरीक आणि मानसिक बदल घडत होते. यामुळेच कालांतराने आपण स्त्री नाही तर पुरुषच आहोत, असं ललिताला वाटायला लागलं. लग्नाचा विषय घरात चालू होताच आपल्या मनाची झालेली द्विधा अवस्था तिने घरच्यांना सांगितली. वैद्यकीय चाचण्यांनंतर असं समजलं की ललितामध्ये पुरुषी हार्मोन्स तयार होत आहे. अखेर डॉक्टरांनी ललिताला लिंग परिवर्तनाचा सल्ला दिला. घरच्यांच्या परवानगीनंतर ललिताने लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतला.


ललिता ही पुरूषच!

लिंग परिवर्तनाच्या सर्जरीसाठी ललिता मुंबईत दाखल झाली. वैद्यकीय चाचणीनंतर काही निष्कर्ष समोर आले. मानवी शरीरामध्ये XX आणि XY क्रोमोझोम असतात. ज्यामध्ये XX क्रोमोझोम मुलींमध्ये तर XY क्रोमोझोम मुलांमध्ये असतो. ललितामध्ये XY क्रोमोझोम आहे. याचा अर्थ ती मुळातच पुरूष आहे. त्यामुळे 'ललिताचा लिंग परिवर्तनाचा निर्णय योग्यच आहे', असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.


शारिरीकदृष्टया मी कमजोर आहे. बोलता येत नाही. पण मनाने मी समाधानी आहे.

ललित साळवे


...आणि सर्जरी यशस्वीपणे पार पडली

वैद्यकीय चाचण्यांनंतर काल दिनांक २५ मे रोजी ललितावर शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. चार तासांच्या शस्त्रक्रियेमध्ये युरिनेशनसाठी एक ट्यूब बसवण्यात आली आहे. प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्जरी पार पडली. पुढील सर्जरी येत्या ३ ते ६ महिन्यांत होणार असून त्यामध्ये मिशी, दाढी आणि केशरचनेची सर्जरी होणार आहे.


घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ललितचं सर्व शिक्षण त्याच्या मामाच्या घरी झालं. लहानपणीच आम्हाला याची कल्पना आली होती. पण याचा कशा प्रकारे सामना करावा? हे माहीत नव्हतं. स्वतःच्या लेकराला एवढ्या त्रासात कधी पाहिलं नव्हतं. पण त्याच्या मनासारखं झालं यातच आम्ही खुश आहोत.

ललितची आईहेही वाचा

ललिताला दर्जा पुरूषाचा की स्त्रीचा?


संबंधित विषय
ताज्या बातम्या