ललिताला दर्जा पुरूषाचा की स्त्रीचा?

ललिता साळवेला लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिल्यानंतरही पोलिस ललिताबाबत संभ्रमात आहेत. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ललिताच्या कामाचं स्वरूप कशा प्रकारे असणार? तिला पोलिस खात्यात मिळणाऱ्या सुविधा या पुरूषांप्रमाणे द्यायच्या की स्त्रियांप्रमाणे? या सर्वांबाबत बीडच्या जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर गोविंदराजन यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना पत्र व्यवहार केला आहे. त्यानुसार सतीश माथूर यांनी गृहविभागाला याप्रकरणी 'गाइड लाइन्स' देण्याची मागणी केली आहे.

SHARE

माजलगावमधील काॅन्स्टेबल ललिता साळवेला प्रदीर्घ संघर्षानंतर लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी गृहखात्याने परवानगी दिली असली, तरी ललिताच्या कामाचं स्वरुप काय असणार? याबाबत आता पोलिस प्रशासन विचार करू लागलं आहे. त्यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी गृहखात्याला पत्र लिहून विचारणा देखील केली आहे. त्यामुळे अशा दुर्मिळ घटनाना मार्गी लावण्यासाठी गृहखातं लवकरच मार्गदर्शक तत्वे (गाइडलाइन्स) बनवणार आहे.


पाठपुराव्यानंतर परवानगी

माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील व बीड पोलिस दलात कार्यरत असलेल्‍या महिला पोलिस ललिता साळवेला गेल्या अनेक वर्षांपासून शरिरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची इच्छा होती. यासाठी तिने पोलिस महासंचालकांना पत्र व्यवहार करून परवानगी मागितली होती.

ललिता ही भरतीच्या वेळी महिला म्हणून भरती झाली असून लिंगबदल केल्यानंतर ती पुरूष होईल. याबाबत कोणताही नियम अस्तित्वात नाही. त्यामुळे पोलिस महासंचालकांनी ललिताचा अर्ज फेटाळला होता. अखेर गृहविभागाने ललिताच्या लिंगबदलाला परवानगी दिल्यानंतर पोलिस महासंचालकांनी देखील परवानगी दिली आहे.


नियम पुरूष म्हणून की स्त्री म्हणून?

परवानगी दिल्यानंतरही पोलिस ललिताबाबत संभ्रमात आहेत. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ललिताच्या कामाचं स्वरूप कशा प्रकारे असणार? तिला पोलिस खात्यात मिळणाऱ्या सुविधा या पुरूषांप्रमाणे द्यायच्या की स्त्रियांप्रमाणे? या सर्वांबाबत बीडच्या जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर गोविंदराजन यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना पत्र व्यवहार केला आहे. त्यानुसार सतीश माथूर यांनी गृहविभागाला याप्रकरणी 'गाइड लाइन्स' बनवण्याची मागणी केली आहे.


जे. जे. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

या शस्त्रक्रियेसाठी ललिताला पोलिस खात्याकडून विशेष रजा मंजूर करण्यात आलेली आहे. अशा दुर्मिळ शस्त्रक्रियेसाठी सेंट जॉर्ज येथील डीएमईआर विभागात परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे ललिता साळवे यांनी सांगितलं. त्यासाठीच्या चाचण्यांसाठी ललिता मंगळवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात येणार आहे.हेही वाचा

उच्च न्यायालयाच्या इतिहासात 'असं' कधीच घडलं नाही! हॅट्स ऑफ!संबंधित विषय
ताज्या बातम्या