Advertisement

लिंगबदल शस्त्रेक्रियेसाठी ललिताला परवानगी

बीडच्या माजलगाव तालुक्यातील राजेगावमधील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली ललिता साळवे २०१० मध्ये बीड पोलिस दलात रूजू झाली होती. गेल्या काही वर्षांपासून शरिरातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे तिची लिंगबदल करण्याची इच्छा होती. यासाठी तिने जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्याची रजा आणि त्यानंतर पोलिस दलात पुन्हा पुरुष पोलिस म्हणून रुजू करुन घेण्याची मागणी केली होती.

लिंगबदल शस्त्रेक्रियेसाठी ललिताला परवानगी
SHARES

बीड पोलिस दलातील काॅन्स्टेबल ललिता साळवेला प्रदीर्घ संघर्षानंतर लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी गृहखात्याने अखेर परवानगी दिली. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी ललिताला शस्त्रक्रियेच्या परवानगीचं पत्र दिलं आहे. त्यामुळे लिंगबदल शस्त्रक्रियेनंतरही ती पोलिस दलात कायम राहू शकणार आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान करण्यात येणाऱ्या चाचण्यांसाठी ललिता मंगळवारी सीएसटी येथील सेंट जाॅर्ज रुग्णालयात जाणार आहे.


कोण आहे ललिता?

बीडच्या माजलगाव तालुक्यातील राजेगावमधील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली ललिता साळवे २०१० मध्ये बीड पोलिस दलात रूजू झाली होती. गेल्या काही वर्षांपासून शरिरातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे तिची लिंगबदल करण्याची इच्छा होती. यासाठी तिने जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्याची रजा आणि त्यानंतर पोलिस दलात पुन्हा पुरुष पोलिस म्हणून रुजू करुन घेण्याची मागणी केली होती.


पोलिस महासंचालकांनीही फेटाळला अर्ज

मात्र, हा विषय अधिक्षकांच्या अखत्यारित नसल्याने त्यांनी ललिताचा विनंती अर्ज पोलिस महासंचालक सतिष माथूर यांच्याकडे पाठवला. परंतु त्यांनीही लिंगबदल करुन सेवेत रुजू करुन घेण्यासाठी कोणताच नियम नसल्याचं म्हणत तिची विनंती फेटाळली होती.


न्यायालयात धाव

त्यानंतर शरिरात बदल करण्याचा नैसर्गिक अधिकार असल्याने कायद्याला धरून ललिताने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ललिताच्या लिंगबदलला परवानगी दिली. मात्र, गृहविभागात अशी दुर्मिळ घटनेची पहिलीच बाब आसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्‍या. प्रसार माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने या प्रकरणाचा सहानभुतीपूर्वक विचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले.


तामिळनाडूतील दाखला

तामिळनाडू उच्च न्यायालयाने एका तृतीय पंथीयाच्या प्रकरणात घेतलेल्‍या निर्णयाच्या आधारे ललिताला लिंगबदलाला परवानगी देण्यात आली. पोलिस महासंचालक सतिष माथूर यांनी गृहविभागाचा हा आदेश बीड जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांना दिला. तसंच या शस्त्रक्रियेसाठी तिला विशेष सुट्टीही देण्यात आली आहे.


कुठे होणार शस्त्रक्रिया ?

या लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी सीएसटीतील सेंट जाॅर्ज येथील डीएमईआर विभागाची परवानगी घ्यावी लागते. विविध चाचण्यानंतर जे. जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केली जाणार सेंट जाॅर्ज रुग्णालयात जाणार आहे.


ललिताची घरची परिस्थीती बेताची आहे. ती आई-वडिल आणि भावासोबत बीडमध्ये राहते. भावाला नोकरी नसल्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी ललितावर आहे. तिच्या शस्त्रक्रियेला परवानगी मिळाली नसती. तर तिची मानसिक स्थिती खालावली असती. गृह विभागाकडून मिळालेल्या परवानगीमुळे घरात आनंदाचं वातावरण आहे. मी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानतो. आमची परिस्थीती लक्षात घेऊन त्यांनी गृह विभागाला आदेश दिले.
- अर्जुन उजगरे, ललिताचे काकाहेही वाचा-

ललिताच्या याचिकेकडे सहानुभूतीने बघा, उच्च न्यायालयाचे मॅटला आदेश

'लिंगबदलानंतरही नोकरी कायम ठेवा', ललिता साळवेची कोर्टात याचिकासंबंधित विषय
Advertisement