ललित आठवड्याभरातच येणार आॅन ड्युटी!

लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण होताच जन्म झाला ललित साळवेचा. ललितला मंगळवारी सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अतिशय प्रसन्न अन् तितक्याच सकारात्मक बोलणाऱ्या ललितने आठवड्याभरातच कामाला रूजू होणार असल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

SHARE

बीड जिल्ह्यातील पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवेच्या लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण होताच जन्म झाला ललित साळवेचा. ललितला मंगळवारी सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अतिशय प्रसन्न अन् तितक्याच सकारात्मक बोलणाऱ्या ललितने आठवड्याभरातच कामाला रूजू होणार असल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

मुळातच पुरुष असलेल्या ललितला तरूणपणात आपण स्त्री नसल्याची जाणीव झाली अन् तिथून स्वत: चं अस्तित्व मिळवण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी ललिता दाखल झाला. अनेक शारीरिक चाचण्यानंतर प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.


बघा, काय म्हणाला ललित
सर्जरीचा पहिला टप्पा

लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेत ललिताच्या शरीरामध्ये यूरिनेशनसाठी कृत्रिम ट्यूब बसवण्यात आलं आहे. ललिता तरुण असल्याने ऑपरेशनदरम्यान जास्त रक्त वाया गेलं नाही तसंच तिचा रक्तदाबसुद्धा नॉर्मल होता. ऑपरेशनच्या वेळी तिला व्हेंटिलेटरवर टाकण्यात आलं होतं. तिचं पुढील ऑपरेशन ३ ते ६ महिन्यानंतर करण्यात येईल.


शरीराने आणि मनाने समाधानी

शस्त्रक्रियेआधीची ललिता आणि शस्त्रक्रियेनंतरचा ललित यामध्ये खूप मोठा फरक होता. या सर्जरीने आपल्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. मला नवी ओळख मिळाल्याने मी फक्त शरीरानेचं नाही तर मनानेदेखील समाधानी आहे, असं ललित म्हणाला.


कामावर होणार रूजू

महाराष्ट्र पोलिस आपल्या कामाशी किती एकनिष्ठ आहे, हे ललितच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसून येत आहे. एवढी मोठी शस्त्रक्रिया होऊनदेखील ललित आठवड्याभरातच पोलिस दलात नव्या नव्या नावासह आणि गणवेशासह रूजू होणार आहे.


शारीरिकदृष्ट्या सक्षम

ललित शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. त्याला ७ दिवसांच्या विश्रांतीची गरज आहे. पण कामाशी एकनिष्ठ असल्याने आम्हीदेखील ललितला कामावर रूजू होण्याची परवानगी दिली आहे, असं सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता मधुकर गायकवाड यांनी सांगितलं.हेही वाचा-

ललिताच्या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार

ललिताला दर्जा पुरूषाचा की स्त्रीचा?संबंधित विषय
ताज्या बातम्या