Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १३१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) १३१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १७२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी १३१ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) १३१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १७२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खांदा कॉलनी, कळंबोली आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ७, नवीन पनवेल १३, खांदा काॅलनी ११, कळंबोली २८, कामोठे २९, खारघर ३६, तळोजा येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल २८ नवीन पनवेल ३३, कळंबोली २०, कामोठे ४९, खारघर ३७, तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.  

दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २२१२४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २०२७१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३४५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा

मलेरियावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश

धक्कादायक! तपासणी केली नसतानाही कोरोना पॉझिटिव्हसंबंधित विषय
Advertisement