Advertisement

मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोची लागण झाल्याने 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कुर्ला येथील रहिवासी असलेल्या या मुलाला ताप येत असल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले

मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोची लागण झाल्याने 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील कुर्ला येथे एक विचित्र प्रकार ध़ला आहे. १४ वर्षांच्या मुलाला एकाचवेळी डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांची लागण झाली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा करुनही त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. डॉक्टरांनी हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महिन्याच्या सुरुवातीला मुलाला ताप आला होता. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष गेलं. मुलगा डॉक्टरकडे गेलाच नाही. याउलट त्याने एका स्थानिकाडून उपचार घेतले. जवळपास आठवडाभर तो त्याच्याकडून उपचार घेत होता.

यानंतर 14 ऑगस्टला त्याने सरकारी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली. रुग्णालयात चाचण्या करण्यात आल्या असता,  त्याला डेंग्यू आणि मलेरिया दोन्हींची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. आश्चर्याची बाब म्हणजे, अतिरिक्त चाचण्या करण्यात आल्या असता त्याला लेप्टोस्पायरोसिसची लागणही झाली असल्याचं समोर आलं. 



हेही वाचा

गुड न्यूज! मोरा ते मुंबई जलमार्गाच्या तिकिट दरात कपात

'ट्विन टनेल' सोडवणार मुंबईतील वाहतूक कोंडी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा