Advertisement

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन १४५ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (६ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १४५ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन १४५ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शुक्रवारी (६ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १४५ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४५,२८८ झाली आहे. 

शुक्रवारी बेलापूर २१, नेरुळ २०, वाशी ९, तुर्भे १२, कोपरखैरणे २३, घणसोली १७, ऐरोली ४१, दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ४५, नेरुळ ३२, वाशी १५, तुर्भे १५, कोपरखैरणे २४, घणसोली १५, ऐरोली ७, दिघामध्ये ५ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२,८५५ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९१८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा -

दिवाळीची सुट्टी झाली १४ दिवसांची, होणार लगेच लागू

अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण, न्यायालयाने सचिवांना सुनावलं



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा