Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन १५१ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (२६ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १५१ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन १५१ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (२६ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १५१ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४७,७०१ झाली आहे. 

गुरूवारी बेलापूर ४०, नेरुळ २९, वाशी २६, तुर्भे १९, कोपरखैरणे १३, घणसोली ७, ऐरोली १२,  दिघामध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर १७, नेरुळ १४, वाशी १४, तुर्भे ११, कोपरखैरणे १२, घणसोली १५, ऐरोलीमध्ये ११ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५,१६६ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९७१ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १५६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईतील घटत असलेली कोरोना रुग्ण संख्या आता दिवाळीनंतर पुन्हा वाढली आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही घटून २६५ दिवसांवर आला आहे. दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ३५२ दिवस होता

दरम्यान, पालिकेकडे उपलब्ध खाटांची संख्या पुरेशी आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कोरोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याची सध्या गरज नाही, असं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे. दिवाळीमध्ये अनेक नागरिक बाहेर पडले. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली.  दिवसाला नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकांवरून पुन्हा ३ अंकांवर आली आहे.हेही वाचा

पालिकेनं NFDC सोबतचा ‘हा’ करार मोडला

26/11 Attack : कसाबविरोधात साक्ष देणाऱ्या 'तिला' न्याय कधी मिळणार?Read this story in English or हिंदी
संबंधित विषय