Advertisement

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी कोरोनाचे १७१ नवीन रुग्ण

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी कोरोनाचे १७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी कोरोनाचे १७१ नवीन रुग्ण
SHARES

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी कोरोनाचे १७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५४२१ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १३५ वर गेला आहे. 

गुरूवारी सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेलमधील २४, नवीन पनवेलमधील ३०, खांदा काॅलनी १२,  कळंबोलीतील ७१, कामोठे २५, खारघरमधील २७ आणि तळोजामधील १३ रूग्णांचा समावेश आहे. पालिका क्षेत्रातील कळंबोलीमधील १,  नवीन पनवेल, कामोठे येथील प्रत्येकी २ आणि पनवेलमधील ३ अशा ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 गुरूवारी १५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेलमधील ३९, नवीन पनवेलमधील २३, कळंबोलीतील २०, कामोठे २५, खारघरमधील ३४ आणि तळोजामधील १० रूग्णांचा समावेश आहे. पनवेल मनपा क्षेत्रात आतापर्यंत ३८९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १३९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा -

मुंबईत खारमध्ये कोरोना वाढीचा वेग सर्वात कमी

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा