Advertisement

कल्याण डोंबिवलीत १९४ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी १९४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत १९४ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी १९४ नवीन कोरोना रुग्ण आढळले.  तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. २१२ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २६,८१७ झाली आहे. यामध्ये ३१५७ रुग्ण उपचार घेत असून २३,०९५ रूग्ण बरे झाल आहेत. तर आतापर्यत ५६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व २८, कल्याण पश्चिम ५८, डोंबिवली पूर्व ४५, डोंबिवली पश्चिम ५४, मांडा टिटवाळा २, मोहना ५, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ९ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, २ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा - 

गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही  

लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा