Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी १९५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (१९ सप्टेंबर) १९५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. २३४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी १९५ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (१९ सप्टेंबर) १९५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. २३४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये नवीन पनवेल आणि पनवेल येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४०, नवीन पनवेलमधील १९, खांदा कॉलनीतील ११, कळंबोली-रोडपाली येथील ३२,  कामोठ्यातील ४९, खारघरमधील ४०, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ३०,  नवीन पनवेलमधील ४५, कळंबोली-रोडपाली येथील ३५, कामोठ्यातील ४९, खारघरमधील ७१,  तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १६२५१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १३७८६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३६९ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २०९६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास अशक्यच, आर्थिक खर्चाच चढता क्रम कायम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा