Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी २१५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१५ सप्टेंबर) २१५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी २१५ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१५ सप्टेंबर) २१५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.  तर ५ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघरमधील ३ आणि कामोठ्यातील २ रुग्णाचा समावेश आहे. १५९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २८, नवीन पनवेलमधील ३७, खांदा कॉलनीतील १०, कळंबोली-रोडपाली येथील ४७,  कामोठ्यातील ४५, खारघरमधील ४८ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील २०,  नवीन पनवेलमधील ३४, कळंबोली-रोडपाली येथील २५, कामोठ्यातील ३७, खारघरमधील ४२,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १५३३५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १२८३९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३५२ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २१४४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा

इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचं बीएमसीसमोर आव्हान

नव्वदी पार केलेल्या २ रूग्णांची कोरोनावर मातसंबंधित विषय