Advertisement

3 महिन्यांत मलेरियाचे २ हजार २१८ रुग्ण


3 महिन्यांत मलेरियाचे २ हजार २१८ रुग्ण
SHARES

कधी ऊन, कधी पाऊस हे वातावरण डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांच्या विषाणूंसाठी उत्तम असतं. मुंबईत सध्या हीच परिस्थिती आहे. त्यात २९ ऑगस्टला झालेला पाऊस, पाण्याचा नीट न झालेला निचरा यामुळे दिवसागणिक मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत मलेरियाच्या २ हजार २१८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक तासाला मलेरियाच्या रुग्णांमध्ये भर पडत असल्याचं महापालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालं आहे.

जुलै महिन्यात मलेरियाचे ७५२ रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये १ हजार ४८ रुग्ण आणि सप्टेंबरच्या १५ दिवसांत ४१८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे साथीच्या आजारामुळे वाढणाऱ्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर होताना दिसून येत आहे.


मलेरियामुळे तिघांचा मृत्यू

मलेरियामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात मलेरियामुळे २ आणि ऑगस्ट महिन्यात एकाचा मृत्यू झाला आहे.  


आजारापासून बचावासाठी हे करा 

डास, मच्छर यांच्या डंखापासून वाचवण्यासाठी घरात मच्छरदाण वापरावी, सांडपाण्याचा निचरा करणे तसंच कुठेही पाणी साठू न देणे, अंगभर कपडे घालणे, जंतुनाशक फवारणी करुन घेणे.


डॉक्टरांचा सल्ला सर्वात महत्त्वाचा

मलेरियाचा जर डास चावला तर रात्री ताप येण्याची शक्यता अधिक असते. जवळपास अर्धा तास थंडी वाजून एकदम ताप भरून येतो आणि काही तासांनी उतरतो. ताप आणि पाठोपाठ घाम असं सलग दोन ते तीन दिवस सुरू राहतं. दोन ते तीन आठवड्यांनी ही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे जर अशी लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा