Advertisement

बापरे! महिलेच्या योनीमार्गातून काढल्या २३ गाठी


बापरे! महिलेच्या योनीमार्गातून काढल्या २३ गाठी
SHARES

सीएसएमटी येथील कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीत झालेल्या फॅब्राईडच्या २३ गाठी काढण्यात यश मिळवलं आहे. या गाठी महिलेच्या पोठातून न काढता योनीमार्गातून काढण्याची करामत या डाॅक्टरांनी केली अाहे. त्यामुळे अशाप्रकारची बिनटाक्याची शस्त्रक्रिया मोजक्या ठिकाणी किंवा स्वत:च्या रिस्कवर केली जाते, असाही दावाही कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे.


गर्भाशयाची पिशवी काढण्याचा दिला होता सल्ला

४१ वर्षीय मनीषा कांबळे या गेली ४-५ वर्षांपासून पोटदुखीने त्रस्त होत्या. त्यांना सतत पांढरा स्त्राव व्हायचा. केईएम रुग्णालयात मनीषावर उपचार सुरू होते, तेव्हा डॉक्टरांनी गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सल्ला दिला होता. पण पिशवी काढण्यासाठी वय कमी असल्याचं सांगत केईएममधून त्यांना या शस्त्रक्रियेसाठी नकार देण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना कामा रुग्णालयात दाखल केलं. जवळपास महिनाभर त्या कामा रुग्णालयात उपचार घेत आहेत.


२३ फॅब्राईडच्या गाठी अाढळल्या

मनीषा यांच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर आणि आत छोट्या-मोठ्या अशा २३ फॅब्राईडच्या गाठी होत्या. त्यापैकी सर्वात मोठी गाठ ही ८ सेंटीमीटरची होती. महिलेचं गर्भाशय हे ३ इंचापर्यंत असतं. पण मनीषाच्या गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड १६ सेंटीमीटर एवढं झालं होतं. त्यामुळे शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी ही किचकट अशी शस्त्रक्रिया तर केलीच तीही एकसुद्धा टाका न बसवता. या सर्व गाठी आणि गर्भाशयाची पिशवी मनीषाच्या योनीमार्गातून बाहेर काढण्यात आल्या आहेत. राजीव गांधी योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.


गेले ४-५ वर्ष सतत पोटदुखीचा त्रास होत होता. सतत पाढंरा स्त्राव जायचा. केईएममध्ये उपचार सुरू होते. पण पिशवी काढण्याचं हे वय नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. शेवटी कामा रुग्णालयात दाखल केलं. शस्त्रक्रिया होऊन १२ दिवस झाले आहेत. इथल्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली अाहे. मला अाता कसलाच त्रास होत नाही.
- मनीषा कांबळे, रुग्ण


आता मनीषा यांची प्रकृती ठिक आहे. त्यांच्यावर आम्ही शस्त्रक्रिया केली, पण त्यांना एकही टाका बसवलेला नाही. कारण आम्ही त्यांच्या योनीमार्गातून गर्भाशयाची पिशवी आणि तिला असलेल्या एकूण २३ गाठी काढल्या आहेत. शिवाय अशी शस्त्रक्रिया खूप कमी रुग्णालयात केली जाते. आम्ही ही आधी या शस्त्रक्रियेसाठी खूप घाबरलो होतो. पण अनुभवाच्या जोरावर अाम्ही हे काम फत्ते केले.
डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय

हेही वाचा -

वाडियामध्ये तिसरी सयामी शस्त्रक्रिया यशस्वी

महापालिकेच्या रुग्णालयातही होणार रोबोटिक शस्त्रक्रिया?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा