Advertisement

'लालबागचा राजा' आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंडळानं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

'लालबागचा राजा' आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान
SHARES

'नवसाला पावणारा' अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा प्रथमच गणेशोत्सव साजरा केला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंडळानं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, यंदा आयोजित केलेल्या आरोग्योत्सवात आत्तापर्यंत २४६ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. तर १० हजारांहून अधिक जणांनी रक्तदान केल्याची माहिती समोर येत आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई व राज्यातील शहीद झालेल्या ९१ पोलिस कर्मचारी बांधवांच्या कुटुंबीयांना शौर्यचिन्ह आणि प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच, गलवान खोऱ्यात देशासाठी शहीद झालेल्या २२ जवानांच्या कुटुंबीयांना मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २ लाख रूपये देण्यात आले. 

४ मे ते ४ जून या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळपास २९ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे वाटप केल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. यंदा गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून घेण्यात आला होता. 



हेही वाचा -

JEE च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

आरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा