Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (९ सप्टेंबर) २५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर कळंबोली येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (९ सप्टेंबर) २५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले.  तर कळंबोली येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १७५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५८,  नवीन पनवेलमधील ४३, खांदा कॉलनीतील ८, कळंबोली-रोडपाली येथील २५, कामोठ्यातील ५८, खारघरमधील ४८,  तळोजा येथील १४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील २१,  नवीन पनवेलमधील ४९ कळंबोली-रोडपाली येथील २६, कामोठ्यातील ४४, खारघरमधील ३४,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.  आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १३८६७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ११७१७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १८२९ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू

रिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहात हलवले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा