Advertisement

राज्यात २८६ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ३२०२ वर

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्ण संख्या ३२०२ वर गेली आहे

राज्यात २८६ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ३२०२ वर
SHARES

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्ण संख्या ३२०२ वर गेली आहे. राज्यात गुरुवारी २८६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसंच, दिवसभरात ५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. याबाबात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. 

कोरोनाकरीता आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ३२०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ६१०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. गुरूवारी राज्यात ७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मृत्यूंपैकी मुंबईचे ३, पुण्यातील ४ आहेत. त्यापैकी ५ पुरुष तर, २ महिला आहेत. ४ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (८६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या आता १९४ झाली आहे.



हेही वाचा - 

एका दिवसात कोरोना बाधित पोलिसांची संख्या दुप्पट

राज ठाकरेंचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ‘असा’ ऐकला, दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा