Advertisement

राज्यात २९ हजार नवे रुग्ण, तर ४४ हजार रुग्ण बरे

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ५५ लाख २७ हजार ०९२ वर पोहोचला आहे. यापैकी ५० लाख ७० हजार ८०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत.

राज्यात २९ हजार नवे रुग्ण, तर ४४ हजार रुग्ण बरे
SHARES

राज्यात शुक्रवारी  कोरोनाचे नवीन २९ हजार ६४४ रुग्ण आढळले आहेत. तर ४४ हजार ४९३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत ५५५ मृतांची नोंद झाली आहे. 

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ५५ लाख २७ हजार ०९२ वर पोहोचला आहे. यापैकी ५० लाख ७० हजार ८०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. तर आतापर्यंत ८६ हजार ६१८ रुग्णांनी प्राण गमावला आहे. सध्या राज्यात ३ लाख ६७ हजार १२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत शुक्रवारी १४१६१ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. तर १७६६१ रुग्ण बरे झाले आहेत.  मुंबईत आतापर्यंत एकूण  ६४९३८९ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर  ९३ टक्के आहे. सध्या मुंबईत २९१०३ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३१७ दिवस झाला आहे. 



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा