Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ३१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१७ नोव्हेंबर) ३१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ३१ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१७ नोव्हेंबर) ३१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेल,‌कामोठे आणि तळोजा येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३, नवीन पनवेल १, खांदा काॅलनी १, कळंबोली २, कामोठे ८, खारघर १५, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल १४, कळंबोली ९, कामोठे ३५, खारघर १०, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४४७८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३५०८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७० जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४०० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

स्मारक की मातोश्री तीन??, मनसेचा खोचक प्रश्न



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा