Advertisement

मुंबईत ३३ लाख संशयित रुग्ण विलगीकरणातून मुक्त

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संशयित, रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि प्रवास करून शहरात परतलेल्या लोकांना विलगीकरणाचा पर्याय देण्यात आला होता.

मुंबईत ३३ लाख संशयित रुग्ण विलगीकरणातून मुक्त
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचं दिसून येत आहे. विलगीकरण केलेले संशयित रुग्णही मोठ्या प्रमाणावर सोडले गेले आहेत. मुंबईत आतापर्यंत ३३ लाख ७१ हजार जणांना विलगीकरणातून मुक्त करण्यात आलं आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संशयित, रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि प्रवास करून शहरात परतलेल्या लोकांना विलगीकरणाचा पर्याय देण्यात आला होता. त्यानुसार संस्थात्मक विलगीकरण आणि गृह विलगीकरणातून कोरोना संशयितांवर उपचार सुरू होते. यापैकी गृह विलगीकरणात सव्वाचार लाखांहून अधिक व्यक्ती होत्या.

कोरोना नियंत्रणांसाठी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत ३८ लाख ४ हजार १७० संशयित रुग्ण पालिकेला सापडले आहेत. यापैकी १६ लाख ४० हजार ७४८ संशयित रुग्ण अतिजोखमीच्या, तर २१ लाख ६३ हजार ४२२ कमी जोखमीच्या गटात होते. या शोधमोहिमेत सापडलेल्या ३३ लाख ७१ हजार ११२ संशयित रुग्णांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण झाला असून विलगीकरणातून ते मुक्त झाले आहेत.



हेही वाचा-

अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करण्यावर बंदी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा