नवी मुंबईत गुरूवारी (३ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३३५ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २७,११२ झाली आहे.
गुरूवारी बेलापूर ७१, नेरुळ ७३, वाशी ५१, तुर्भे ४२, कोपरखैरणे ३२, घणसोली २३, ऐरोली ३७, दिघामध्ये ६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ३४, नेरुळ ५०, वाशी २२, तुर्भे १९, कोपरखैरणे ३५, घणसोली ४१, ऐरोली ३७ आणि दिघामधील ५ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२९३३ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६११ झाला आहे.
नवी मुंबईत सध्या ३५६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. नवी मुंबईत ४ हजार ३५८ खाटांची संख्या आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथेही १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आणखी तेराशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.