कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी ३४२ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १७,७३१ झाली आहे.
३८१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये ५६९६ रुग्ण उपचार घेत असून ११,७४६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३४२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ५५, कल्याण प. ८९, डोंबिवली पूर्व १२०, डोंबिवली प ५०, मांडा टिटवाळा ७, मोहना २० तर पिसवली येथील एका रूग्णाचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २२५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ९ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
हेही वाचा -
Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis: रुग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढवणं नाही- देवेंद्र फडणवीस