Advertisement

devendra fadnavis: रुग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढवणं नाही- देवेंद्र फडणवीस

भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुंबईतील कमी चाचण्यांना लक्ष्य केलं.

devendra fadnavis: रुग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढवणं नाही- देवेंद्र फडणवीस
SHARES

रूग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढविणं नाही. तर त्याजोडीला पुरेसे आरोग्य कर्मचारी, आरोग्य सुविधा मिळणं देखील अभिप्रेत आहे. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचणी करणं हाच एकमेव मार्ग आहे. त्याकडे आपण का लक्ष देत नाही, हा मोठाच प्रश्न आहे, असं म्हणत भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुंबईतील कमी चाचण्यांना (bjp leader devendra fadnavis criticised MVA government over poor covid 19 facilities in maharashtra) लक्ष्य केलं.

मुंबईतील चाचण्या

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील चाचण्यांची सरासरी काढताना म्हटलं आहे की, मुंबईत पुरेशा कोरोना चाचण्या होत असल्यासंदर्भात महापालिकेने एक निवेदन जारी केलं. त्याच निवेदनानुसार, पहिल्या १ लाख चाचण्यांना ९१ दिवस लागले म्हणजे (सरासरी दररोज १०९८ चाचण्या), दुसर्‍या लाखासाठी २५ दिवस, तिसर्‍या लाखासाठी आणखी २५ दिवस (म्हणजे प्रत्येक दिवशी केवळ ४००० चाचण्या) आता २५ जून ते ८ जुलैपर्यंत १३ दिवसांत ७४, १४२ चाचण्या = म्हणजे दररोज ५७०३ चाचण्या! मुंबईत ८९,१२४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांमध्ये २४% पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असताना दैनंदिन चाचण्यांचं प्रमाण इतकं कमी का? कृपया लक्षात घ्या, चाचण्या वाढविल्याशिवाय कोरोनाविरूद्धचं युद्ध जिंकणं अवघड आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महापालिकेला चाचण्या वाढवण्याची विनंती केली.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात- शरद पवार

राज्य सरकारने खाजगी रूग्णालयांसंदर्भात जो आदेश काढला आहे, तो संदिग्ध असल्याने मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट होत आहे. तो आदेश बदलण्याची गरज आहे. चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे. आरोग्य कर्मचारी प्रचंड परिश्रम करीत आहेत. पण, कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यात राज्य सरकारने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अपयश लपवण्यासाठी

कोरोनावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी आपलं अपयश लपविण्यासाठी रोज नवीन विषय आणले जातात. तेही संपले की, विरोधक सरकार पाडणार असं सांगायचं, म्हणजे दोन दिवस बातम्यांचा फोकस बदलतो. असं राजकारण बंद करून संपूर्णत: कोरोनावर लक्ष केंद्रीत करावं आणि कोरोनाच्या स्थितीवरसुद्धा अग्रलेख लिहावेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका केला. 

समांतर सरकार नाही

आमच्या समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. परंतु समांतर सरकार चालविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. विरोधी पक्षनेते म्हणून लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा आमचा अधिकार आहे. ते स्वत: फिरणार नाही आणि आम्ही फिरल्याने त्यांना त्रास होणार असेल तर जनतेने जायचं तरी कुणाकडे? कुठल्याही परिस्थितीत आम्ही फिरणं थांबविणार नाही, असंही फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं.

हेही वाचा - मुंबईत दररोज फक्त ४ हजार चाचण्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

संबंधित विषय
Advertisement