Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ३५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (२५ जानेवारी) ३५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ३५ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (२५ जानेवारी) ३५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच खारघरमधील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २,  नवीन पनवेल ४, खांदा काॅलनी ३, कळंबोली ४, कामोठे ९, खारघर १२, तळोजा  येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल ११, कळंबोली २,  कामोठे ६, खारघर येथील ११ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८५७२ कोरोनारूग्णांपैकी २७६३३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६२१ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३१८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा -

मुंबईत २४ तासात तब्बल 'इतक्या' कावळ्यांचा मृत्यू

हार्बर मार्गावर लवकरच धावणार गोरेगाव-पनवेल लोकलसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा