Advertisement

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३५६ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (९ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन ३५६ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३५६ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शुक्रवारी (९ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन ३५६ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३९,७७७ झाली आहे.

शुक्रवारी बेलापूर ६६, नेरुळ ५५, वाशी ५१, तुर्भे ४६, कोपरखैरणे ५२, घणसोली ३७, ऐरोली ४२, दिघामध्ये ७  नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ४३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६३, नेरुळ ८०, वाशी ५३, तुर्भे ५६, कोपरखैरणे ५४,  घणसोली ४२, ऐरोली ८१, दिघामधील ५ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५,४१३ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८०२ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३५६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८९ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा - 

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?

मुंबई लोकलबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा